Thursday, February 12, 2026
Home राजकारण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुनंदाताई पवार यांना उमेदवारी...

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुनंदाताई पवार यांना उमेदवारी द्यावी -सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी

0
227

जामखेड न्युज—–

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुनंदाताई पवार यांना उमेदवारी द्यावी -सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी

 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ गेल्या अनेक वर्षापासून मागासलेला असून या मतदार संघातून सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांना उमेदवारी दिली तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे मत जामखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी यांनी व्यक्त केले.


सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशअध्यक्ष श्री जयंतराव पाटील यांना उमेदवारीसाठी शेकडो व्यापाऱ्यांच्या सहया सहीत मागणी पत्र पाठवले आहे. सर्व समाज बांधव व व्यापाऱ्यां मागणी केली आहे.

तसेच जिल्हयातील वाढती बेरोजगारी याकडे पाहता सौ सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षापासून बेरोजगार तरुण रोजगार उपलब्ध व व्यावसाय करिता व्यासपीठ तयार करून देवून तसेच माहिला बचत तरुणींनी व माहिलांना गटामार्फत जामखेड कर्जत मतदार संघातून आत्तापर्यंत एकुण २५० बचतगट व त्यांना
उपलब्ध करून दिलेले कर्ज व अनेक विधवा माहिला भगिनींना शिलाई मशीन, पिठाची गिरणी, उदबती तयार करण्याची मशिन व त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

40 वर्षपेक्षा जास्त काळ समाजकरणाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण व सक्ष्मीकरण,जलसंधारण, आरोग्य या वर काम करणाऱ्या तरीही समाजमाध्यमापासून लांब राहणाऱ्या पद्मश्री कृषीरत्न डॉ अप्पासाहेब पवार यांच्या सून, कृषिरत्न ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन बारामती ऍग्रो. लि. चे चेअरमन मा राजेंद्र दादा पवार यांच्या
पत्नी, अखंड महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, युवा कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आमदार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मा रोहित दादा पवार यांच्या मातोश्री तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या सचिव, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका आहेत. सुनंदाताई पवार यांच्या दूरदृष्टी मुळे व विकासाच्या व्हिजन मुळे नगर जिल्ह्याचा कायापालट होईल हे नक्कीच!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!