जामखेडची पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षापासून लालफितीतच!!

0
186

जामखेड न्युज—-

जामखेडची पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षापासून लालफितीतच!!

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि फक्त अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर एवढीच घोषणा केली बाकी तालुक्यातील प्रश्न अनुत्तरितच राहिले. मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचा कागद दाखविला होता. अद्याप त्याच्या वर कसलीही कार्यवाही नाही. गेल्या चार वर्षापासून जामखेड पाणीपुरवठा योजना लालफितीतच अडकून आहे. शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.


जामखेड करांना भर पावसाळ्यातही आठ दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाणी पुरवठा योजना आणली म्हणून टिमकी वाजवली होती पण नंतर सरकार गेले नंतर महाविकास आघाडी सरकार आले नंतर आमदार रोहित पवार यांनी सुधारित पाणी पुरवठा योजना मंजुरी आणली असे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली मान्यता नसून कागद होता असे सांगितले. पण गेल्या चार वर्षापासून रखडलेली पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

 

पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न

सध्या जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. जामखेड शहरात आठ दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. भर पावसाळ्यातही अशीच परिस्थिती असते. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजनेची मान्यता दाखवली होती. या निवडणुकीत आमदार प्रा. राम शिंदे पराभूत झाले सरकारही गेले नंतर आमदार रोहित पवार यांनी सुधारित पाणी योजना मंजुरी आणली नंतर परत महाविकास आघाडी सरकार गेले भाजपाचे व शिंदे गटाचे सरकार व विधानपरिषदेत आमदार प्रा राम शिंदे निवड झाली यामुळे श्रेयवादातून एकमेकांच्या कामाला स्थगिती आणण्यासाठी स्पर्धा लागली पाणी योजना रखडली चौंडीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले असता शहरासह तालुक्यातील जनतेला वाटत होते की, पाणी योजना विषयी काही तरी बोलतील पण दोघांनीही भ्रशब्द काढला नाही. यामुळे लोकांची निराशा झाली.

अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार प्रजाहितदक्ष होता न्याय होता मुलभूत प्रश्न, पाणी योजना याचा प्राधान्याने सोडविल्या जात होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मात्र तालुक्यातील पाणीप्रश्न, रोजगाराचा प्रश्न, रस्त्याची दुर्दशा हे प्रश्न दिसले नाहीत तसेच आमदार प्रा राम शिंदे यांना ते प्रश्न महत्त्वाचे वाटले नाहीत. असेच म्हणावे लागेल. यामुळे सध्या तालुक्यात एकच चर्चा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौंडीत आले आणि गेले, तालुक्यातील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here