जामखेड न्युज——
जामखेड बाजार समितीची पहिलीच मासिक सभा गणसंख्येअभावी तहकुब
जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिलीच मासिक सभा आज होती कमीत कमी दहा सदस्य उपस्थित राहणे आवश्यक होते पण नऊ सदस्य उपस्थित राहिले बाकी नऊ सदस्य अनुपस्थित राहिले यामुळे पहिलीच मासिक सभा तहकूब करण्याची वेळ आली.
आज सोमवार दि. ५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती यात सभापती, उपसभापती यांना सह्याचे अधिकार हा विषय महत्त्वाचा होता पण सभापती गटाचे नऊ सदस्य उपस्थित होते तर उपसभापतीसह इतर नऊ सदस्य अनुपस्थित होते यामुळे पहिलीच मासिक सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकित आमदार प्रा. राम शिंदे व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या स्वाभीमानी शेतकरी विकास पॅनलचा नऊ जागा मिळाल्या होत्या तर आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी विकास पँनलला नऊ जागा मिळाल्या होत्या.
यामुळे सभापती व उपसभापती निवड ईश्वर चिठ्ठी द्वारे झाली यात सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाचे शरद कार्ले यांची चिठ्ठी निघाली तर उपसभापती पदी आमदार रोहित पवार यांच्या गटाचे कैलास वराट यांची चिठ्ठी निघाली.
आजची पहिलीच मासिक सभा होती ती गणसंख्येअभावी तहकूब करण्याची वेळ आली आहे. आता 8 जून रोजी मासिक सभा आयोजित केली आहे. या सभेला सर्व संचालक उपस्थित राहतात का नाही हे पाहणे आवश्यक आहे.
आजच्या मासिक सभेसाठी सभापती शरद कार्ले, संचालक गौतम उतेकर, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, गणेश जगताप,वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे,सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे हे नऊ संचालक उपस्थित होते.
तर उपसभापती कैलास वराट, सुधीर राळेभात, अंकुशराव ढवळे, सतिश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय हे नऊ संचालक अनुपस्थित होते.