नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विद्यमान भाजपा सरपंचांच्या मातोश्रींचा मोठ्या फरकाने पराभव शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्याच्या मातोश्रीने केला पराभव

0
170

जामखेड न्युज——

नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विद्यमान भाजपा सरपंचांच्या मातोश्रींचा मोठ्या फरकाने पराभव

शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्याच्या मातोश्रीने केला पराभव

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विद्यमान भाजपाचे सरपंच चंद्रकांत उगले यांच्या मातोश्री उगले कांताबाई बाबासाहेब तसेच शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या मातोश्री सिंधुताई विठ्ठल शिंदे यांच्यात दुरंगी लढत मोठ्या रंगतदार वळणावर होती यात भाजपाचे विद्यमान सरपंचाच्या मातोश्री उगले कांताबाई यांचा पराभव शिवसेना गटप्रमुख संतोष शिंदे यांच्या मातोश्रींनी मोठ्या फरकाने पराभव केला यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे.

नायगाव येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नागरिकांना मागास प्रवर्ग जागेसाठी दोन उमेदवार होते.
उगले कांताबाई बाबासाहेब यांना -112 तर
सिंधुताई विठ्ठल शिंदे यांना -294
नोटा -2


मते मिळाली होती यामुळे 182 मतांनी
सिंधुताई विठ्ठल शिंदे यांचा विजय झाला. विजयाची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद मित्र मंडळाच्या विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ठाकरे गट संजय काशिद, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश उगले, युवा नेते आप्पासाहेब कार्ले, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालक सुरेश पवार,परमेश्वर उगले, भारत उगले, आण्णासाहेब शिंदे, दादासाहेब काळदाते, विनोद उगले, जाकीर शेख, युवासेना शहरप्रमुख सुरज काळे, भास्कर शिंदे, अशोक शिंदे, संजय उगले, गणेश शिंदे, काका शिंदे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here