जामखेड न्युज——-
तेलंगशी येथील पानंद रस्ता चोरीला!!!
रस्ता परत न मिळाल्यास ग्रामस्थांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार -अँड.डॉ. अरूण जाधव

तेलंगशी येथील मुळे वस्ती ते टकले वस्ती असा पानंद रस्ता तयार झालेला होता लोकांची चांगली सोय झाली होती पण गावातील काही लोकांनी तो जेसीबीच्या साहाय्याने बंद केला यामुळे लोकांचे खुप हाल होत आहेत तो रस्ता परत व्हावा अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव यांनी दिला आहे.

तेलंगशी ता.जामखेड येथील दिघोळ रोड ते मुळे वस्ती येथे शासकीय योजनेतून केलेला पानंद रस्ता गायब झाला. दि.09/05/2022 रोजी जानेमाळ वस्ती येथे गावकऱ्यांच्या येण्याजाण्यासाठी पानंद रस्ता तयार करण्यात आला होता. त्याला शासनाने चांगल्या पद्धतीने निधी वापरला होता परंतु 20/04/2023 रोजी पूर्वी पासून चा हा रस्ता लोकांच्या येण्या जाण्या तयार केला होता. परंतु हा रस्ता अज्ञात व्यक्तीने तो रस्ता जेसीबी च्या साह्यानं तो निकामी केला. व गावकरी, शाळेतील विद्यार्थी यांची येण्या जाण्या साठी रस्ता हा कायम बंद झाला आहे.

रात्री बे रात्री अडचण आल्यास शेतकऱ्याला जाण्या साठी रस्ता नाही. दळण वळण ची सुविधा या रस्त्यावरून होत होती. पण हा रस्ता बंद झाल्याने वस्ती व गावाचा,तालुक्याचा ,बाजाराचा,आरोग्य शिक्षण या सर्व गोष्टी रस्ताचा संपर्क तुटल्या मुळे गावकऱ्यांनी आपली अडचण वेथा लेखी स्वरूपात मांडली आहे. जर आमचा पूर्वीचा रस्ता मिळाला नाही. तर आम्ही जामखेड येथे सर्व कुटुंब घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनं उभे करू मा.योगेशजी चंद्रे साहेब तहसीलदार व प्रकाशजी पोळ साहेब गटविकास अधिकारी यांनी गायब झालेल्या रस्ता परत द्यावा व येण्या जाण्या साठी रस्ता खुला करावा आणि ज्या व्यक्तिने रस्ता मध्ये अडथळा निमार्ण करत आहे. त्यांच्या वर कारवाही करावी.

यावेळी अँड.डॉ.अरुण आबा जाधव, पै.सूरज पवार विकास मासाळ, बापूसाहेब ओहोळ, नितीन ढाळे,महादेव गटकळ, लक्ष्मण जायभाय बाबासाहेब जायभाय,सागर रीटे,दत्तात्रय ढाळे,गंगाराम ढाळे,सुनील ढाळे बाजीराव ढाळे,लक्ष्मण ढाळे,रघुनाथ ढाळे,विठ्ठल ढाळे,महोन ढाळे,अशोक ढाळे, सुग्रीव जायभाय, इतर 50 शेतकरी यांनी जामखेड तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.


