सागर काळे यांची मुंबई पोलीस (चालक) पदी निवड

0
270

जामखेड न्युज——

सागर काळे यांची मुंबई पोलीस (चालक) पदी निवड

सागर काळे यांचे लहानपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न होते. ध्येय, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे स्वप्न सागरने पुर्ण केले आहे. त्याची निवड झाल्याची बातमी कळताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सागर हा श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील मुख्याध्यापक दत्ता काळे यांचा मुलगा आहे. त्याचे शिक्षण बीएडीएड झालेले आहे. लेखी व शारीरिक तयारी साठी तो भूम येथील प्रा. सोमनाथ देवकर यांच्या थ्रीएस अँकँडमी मध्ये होता.

जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर सागरने लेखी परीक्षेत शंभर पैकी 91 गुण मिळवले तर शारीरिक (ग्राउंड) परीक्षेत 50 पैकी 43 गुण मिळवले.

सागरने मिळवलेल्या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहायक प्रा. अरूण वराट,उपसरपंच राजाभाऊ वराट, चेअरमन कैलास वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, राजस्थान ग्रेनाइट अँड मार्बलचे संचालक शहादेव वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, ज्ञानाभाऊ मुरूमकर, मुख्याध्यापक आप्पासाहेब शिरसाठ, मुख्याध्यापक दशरथ कोपनर, नानासाहेब लहाने, साकतचे पोलीस पाटील महादेव वराट, भरत लहाने, संतोष देशमुख, खंडू भुजबळ, माऊली क्षिरसागर, प्रकाश चऱ्हाटे, सचिन आजबे, आण्णासाहेब पवळ, डोंणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव, जामखेड तालुका मुख्याध्यापक संघ, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री साकेश्वर विद्यालय साकत, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, भैरवनाथ विद्यालय हळगाव सह जामखेड महाविद्यालय जामखेड प्राचार्य व सर्व स्टाफ तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ अध्यक्ष व सदस्य यांच्या सह मित्र मंडळ नातेवाईक यांनी सागरचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here