आमदार सत्यजित तांबे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या जामखेडमध्ये

0
138

जामखेड न्युज——

आमदार सत्यजित तांबे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या जामखेडमध्ये

  • नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या शुक्रवार दि. १२ रोजी जामखेड मध्ये येत आहेत. दुपारी १२ ते २ या वेळेत ते ल. ना. होशिंग विद्यालयात उपलब्ध असतील तरी पदवीधरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

सत्यजित तांबे हे युवा राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि जास्तीत जास्त तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर त्यांचा भर आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे यापूर्वी तीनदा आमदार झाले आहेत. त्यामध्ये पहिल्या वेळेस कॉंग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून विजय मिळवला होता आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचं संपूर्ण कुटुंब कॉंग्रेसमध्ये होतं. स्वातंत्र्य काळातही थोरात कुटुंब काम करण्यात आघाडीवर होते, तरीही बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेस तिकीट नाकारले होते. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर ते सलग आजपर्यंत आमदार आहे.

सत्यजित यांचे वडील आणि मामा यांच्या प्रमाणेच त्यांनीही स्वतः अपक्ष उमेदवारी करत विजय संपादन करत इतिहास घडवून आणला आहे. त्यामुळे संगमनेरसह संपूर्ण राज्यात भाच्याने मामाच्या आणि वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं अशी चर्चा सुरू झाली होती.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना ६८ हजार ९९९ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. या लढतीत सत्यजित तांबे यांनी सुमारे २९ हजार ४६५ मताधिक्यांनी विजय मिळवत आमदार झाले आहेत.

तरी जामखेड परिसरातील पदवीधर, शिक्षक बंधू भगिनीनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here