जामखेड न्युज——
चार महिन्यांपासून पगार नाही, त्यामुळे जामखेड गट सचिवांचे काम बंद आंदोलन
गेल्या चार महिन्यांपासून पगार नाही त्यामुळे गट सचिवांना उपासमारीची वेळ आली आहे. ताबडतोब पगार मिळावा म्हणून आज दि. १० पासून कामावर बहिष्कार घालण्यात आला आहे तसे निवेदन तालुका विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांना निवेदन दिले आहे. क्रांतीसुर्य गट सचिव संघटना अहमदनगर गट
सचिवांना माहे फेब्रुवारी 2023 पासुन वेतन मिळाले
नसल्याने दिनांक-10/05/2023 पासुन सर्व
कामकाजावर बहिष्काराचे निवेदन तालुका विकास
अधिकारी जामखेड यांना निवेदन सादर करताना
निवेदन देते वेळी अध्यक्ष गजानन शिंदे, तालुका सचिव नितिन सपकाळ, सचिव दिपक नेटके, संतोष गंभिरे, आबासाहेब कोंढाणे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, क्रांतीसूर्य अहमदनगर जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. सचिव संघटना अहमदनगर यांचे दि ०२.०५.२०२३ रोजीचे पत्र वरील संदर्भिय पत्रास अनुसरून विनंतीपूर्वक कळविण्यात येते कि, जिल्हयातील गट सचिवांचे माहे फेब्रुवारी २०२३ पासुन सर्व गटसचिव वेतनापासुन वंचित आहेत त्यामुळे जिल्हयातील गटसचिवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सदर वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्रांतीसूर्य अहमदनगर जिल्हा सचिव संघटना प्रतिनिधींनी दि. ०२.०५.२०२३ रोजी मा. अध्यक्ष साहेब, जिल्हास्तरीय समिती अहमदनगर व मा.चेअरमन साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अहमदनगर यांना वेतनाचा प्रश्न सोडविण्याची विनंती करूनही आजपर्यंत वेतनाचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रांतीसूर्य अहमदनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सचिव संघटना यांचे सुचनेनुसार आज दि १०.०५.२०२३ पासुन प्राथमिक सेवा सहकारी संस्थांच्या सर्व बॅक व शासकिय कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत.
मे. साहेबांनी आमच्या प्रश्नामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालुन आमचे वेतन माहे
फेब्रुवारी २०१३ पासुन होणेसाठी योग्य ते आदेश पारीत करावेत व सचिवांची न्याय मागणी पूर्ण करावी, हि कळकळीची विनंती तालुका विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांना निवेदनाद्वारे केली आहे.