जामखेड न्युज——
कालिका पोद्दार लर्न स्कुलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त
डॉ. सरफराज खान यांच्या हस्ते ध्वजारोहण

शहरातील शैक्षणिक दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या कालिका पोद्दार लर्न स्कुल मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील पोटविकार लँप्रोस्कोपीक अँड जनरल सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सरफराज खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त डॉ. सरफराज खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कालिका पोद्दार लर्न स्कुलचे संचालक सागर अंदुरे, निलेश तवटे, प्राचार्य प्रशांत जोशी सह शिक्षक शिक्षकेतर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत व तद्नंतर १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.


