जामखेड न्युज——
जामखेड न्युज इफेक्टराष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम डांबरीवरच मुरूम बातमी प्रसिद्ध होताच ठेकेदाराने परत मुरूम काढून खोदला रस्ता इस्टीमेट नुसार केले काम सुरू
नागरिकांनी मानले जामखेड न्युजचे आभार
जामखेड न्युजने दि. २९ व ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट काम, रस्ता न खोदता डांबरीवरच मुरूम, इस्टीमेट नुसार काम नाही अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेत ठेकेदाराने ताबडतोब मुरूम काढून घेतला तसेच रस्ता खोदकाम करत मुरूम दबाई करण्यास सुरुवात केली. जामखेड न्युजच्या बातमी मुळेच ठेकेदाराने रस्ता काम सुरू केले आहे. यामुळे जामखेड मधील अनेक नागरिकांनी जामखेड न्युजचे आभार मानले आहेत.
२९ एप्रिल व ३० एप्रिल रोजी जामखेड न्युजने
जामखेड शहरातून पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे.
सध्या पंचदेवालय ते विचंरणा नदीपर्यंत काम सुरू आहे. ठेकेदारांने सब ठेकेदार नेमलेला आहेत. सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. डांबरी रस्ता न खोदता त्यावरच मुरूम टाकलेला आहे. राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या रस्ता निकृष्ट होत असल्याने लवकरच रस्ता खराब होईल. कोट्यवधी रुपये पाण्यात जातील. अशा आशयाची बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत डांबरीवरील मुरूम काढून घेत रस्ता खोदकाम करत दबाई केली करत इस्टीमेट नुसार काम सुरू केले आहे.
संबंधित ठेकेदारांने सब ठेकेदार नेमलेला आहे.
या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असलेला रस्ता नियोजनाचा अभाव अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निकृष्ट प्रतीचा होत आहे. डांबरीवरच मुरूम टाकलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या इस्टीमेट नुसार काम होत नाही. संपूर्ण रस्ता खोदकाम करून मुरूम भरून दबाई करणे आवश्यक आहे पण तसे न करता काही ठिकाणी डांबरी रस्त्यावरच मुरूम टाकला जात आहे. यामुळे निश्चितच रस्त्याचे आयुष्य कमी होणार आहे. या बातमी मुळे परत रस्ता नियमानुसार सुरू झाला आहे.
रस्ता सुरू झाल्यावर गोरगरीब लोकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतले मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तसेच आहेत काढून घेतलेल्या अनेक लोकांनी परत गाडे लावण्यास सुरूवात केली आहे. यातच हे प्रकरण कोर्टात गेले आहे. सहा आठवड्यात संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रस्त्यावर अस्ताव्यस्त मुरूम टाकला जात आहे नीट दबाई केली जात नाही. तसेच पाणीही मारले जात नाही यामुळे धुळीचे लोट ची लोट उठत आहेत. धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बातमीमुळे आता टँकरने पाणी मारणे सुरू झाले आहे तसेच नियमानुसार काम सुरू झाले आहे.
जामखेड न्युजच्या बातमीची दखल घेत ठेकेदाराने
ताबडतोब मुरूम काढून घेतला तसेच रस्ता खोदकाम करत मुरूम दबाई करण्यास सुरुवात केली. जामखेड न्युजच्या बातमी मुळेच ठेकेदाराने रस्ता काम सुरू केले आहे. यामुळे जामखेड मधील अनेक नागरिकांनी जामखेड न्युजचे आभार मानले आहेत.