जामखेड न्युज——-
छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेतील विजेता महेंद्र गायकवाड यास पस्तीस लाखाची सोन्याची गदा प्रदान
नगरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार – देवेंद्र फडणवीस
अहमदनगर येथे आयोजित छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने अर्धा किलो सोन्याची गदा जिंकली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत विजेत्या महेंद्र गायकवाड या मल्लाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
या स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात झाली. कुस्ती खेळताना शिवराज राक्षे याच्या पायाला दुखापत झाल्याने महेंद्र गायकवाड विजयी घोषित करुन त्याला स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेली ३५ लाख रुपये किमतीची अर्धा किलो सोन्याची गदा बहाल करण्यात आली.
८६ किलो वजनगट ते १३५ किलो खुल्या वजनगटात उपांत्य फेरीची कुस्ती गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे (पुणे) यांच्यात झाली. यामध्ये शिवराज राक्षे याने उकृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन १२ गुणांची कमाई केली. कोकाटे याला 2 गुण मिळाले. १० गुणांच्या फरकाने राक्षे विजयी ठरला. अनेकांचे लक्ष लागून असलेल्या माती विभागाच्या उपांत्य फेरीतील सिकंदर शेख (वाशिम) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात अत्यंत अटातटीची लढत प्रेक्षकांना पहावयास मिळाली. शेख याने गुणांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात गायकवाड याने गुणांची कमाई करुन ४-३ ने शेख याला पराभूत केले.
सोन्याच्या गदेसाठी उपांत्य फेरीतील विजयी मल्ल शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात झालेली कुस्ती रंगात आली असताना राक्षे याच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमध्ये राक्षे याने पुढील खेळ खेळण्यास असमर्थता दर्शविल्याने गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले.
मागील दोन दिवसापासून सकाळ व संध्याकाळ कुस्ती स्पर्धेचा थरार सुरु होता. रविवारी सकाळी विविध वजन गटातील अंतिम कुस्त्या पार पडल्या. फक्त ओपन गटातील उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. वाडियापार्क क्रीडा संकुल प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गच्च भरले होते. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. उपविजयी मल्ल शिवराज राक्षे याला २ लाख व तृतीय विजेते ठरलेले गादी व माती विभागातील सिकंदर शेख, माऊली कोकाटे (पुणे) यांना प्रत्येकी ५० हजार देण्यात आले. विविध वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे १ लाख, पन्नास हजार व तीस हजार रुपये तसेच ७९,८६ किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना १ लाख २५ हजार, ७५ हजार व ५० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
——————–
माती विभाग अंतिम निकाल
४८ किलो वजनगट : प्रथम- अजय निंबाळकर (सोलापूर), द्वितीय- समीर खंडगीर (अहमदनगर), तृतीय- गहिनीनाथ शिर्के (बीड).
५७ किलो वजनगट : प्रथम- सुरज अस्वले (कोल्हापूर), द्वितीय- अतुल चेचर (कोल्हापूर), तृतीय- संग्राम जगताप (पुणे).
६१ किलो वजनगट : प्रथम- ज्योतीबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- विजय पाटील (कोल्हापूर), तृतीय- विजय डोंगरे (सोलापूर).
६५ किलो वजनगट : प्रथम- आबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- पंकज पाटील (सांगली), तृतीय- सुरज कोकाटे (पुणे).
७० किलो वजनगट : प्रथम- सोनबा गोंगाणे (कोल्हापूर), द्वितीय- निखील कदम (पुणे), तृतीय- सद्दाम शेख (कोल्हापूर).
७४ किलो वजनगट : प्रथम- अनिल कचरे (पुणे), द्वितीय- अक्षय चव्हाण (पुणे), तृतीय- जतीन आव्हाळे (धुळे).
७९ किलो वजनगट : प्रथम- प्रकाश काळे (सोलापूर), द्वितीय- अविनाश शिंदे (बीड), तृतीय- महादेव कचरे (सोलापूर).
८६ किलो वजनगट : प्रथम- कौतुक डाफळे (कोल्हापूर), द्वितीय- चंद्रशेखर गवळी (धुळे), तृतीय- राहुल काळे (सोलापूर).
——————–
मॅट (गादी) विभाग अंतिम निकाल :
४८ किलो वजनगट : प्रथम- अभिजीत ठाणगे (अहमदनगर), द्वितीय- लक्ष्मण चव्हाण (हिंगोली), तृतीय- हर्षवर्धन जाधव (कोल्हापूर).
५७ किलो वजनगट : प्रथम- अतीश तोडकर (बीड), द्वितीय- रमेश इंगवळे (कोल्हापूर), तृतीय- स्वप्निल शेलार (पुणे).
६१ किलो वजनगट : प्रथम- योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), द्वितीय- सौरभ इंगळे (सोलापूर), तृतीय- भरत पाटील (कोल्हापूर).
६५ किलो वजनगट : प्रथम- सुमितकुमार भारस्कर (बीड), द्वितीय- विक्रम कुर्हाडे (कोल्हापूर), तृतीय- प्रदीप सुळ (सातारा).
७० किलो वजनगट : प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर), द्वितीय- विनायक गुरव (कोल्हापूर), तृतीय- शुभम पाटील (कोल्हापूर).
७४ किलो वजनगट : प्रथम- राकेश तांदुळकर (कोल्हापूर), द्वितीय- शुभम थोरात (पुणे), तृतीय- करण फुलमाळी (अहमदनगर).
७९ किलो वजनगट : प्रथम- शुभम मगर (सोलापूर), द्वितीय- अक्षय घोडके (अहमदनगर), तृतीय- गौतम शिंदे (सोलापूर).
८६ किलो वजनगट : प्रथम- कालीचरण सोलानकर (सोलापूर), द्वितीय- विजय सुसरे (नाशिक), तृतीय- पांडुरंग पारेकर (पुणे).