जामखेड न्युज——
अतिवृष्टीने बाधित शेतकरी सात महिन्यांपासून नुकसान भरपाई पासून वंचित
विमाही नाही आणि नुकसान भरपाईही नाही बळीराजा हवालदिल
गेल्या चार दिवसांपासून राज्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू आहेत सरकारने सांगितले की आठ दिवसात मदत देऊ असे आश्वासन दिले आहे पण मागे खरीप हंगामात अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पीके पाण्यात गेली होती. पंचनामे झाले होते सात आठ महिने झाले तरी अद्याप नुकसान भरपाई नाही तेव्हा नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेती पिकांचे व शेत जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसान भरपाई पोटी अहमदनगर जिल्ह्याला 871 कोटी रुपये मिळावेत असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. यातील अनेक शेतकरी मातीपासून वंचित आहेत मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
अनेक शेतकरी विमा उतरवतात जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा आँनलाईन तक्रार करावी लागते अशिक्षित शेतकरी ती करू शकत नाहीत. यामुळे मातीपासून अनेक शेतकरी वंचित राहतात. लेखी आँफलाईन तक्रार करूनही शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्यात गेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला याचवेळी शासनाने अतिवृष्टी जाहीर केली पंचनामे केले पण नऊ महिने झाले अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही तेव्हा शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता पचंनामे झाले पण शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचे झालं काय अशी विचारणा सोशल मीडियावर सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील शेकऱ्यांचे पावसामुळे पिकांचे खूप मोठें नुकसान झाले होते. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर पण केला होता. तालुक्यांतील सर्व पचंनामे करुन घेतले. सर्व शेतऱ्यांना आपले खाते नंबर तसेच आधार कार्ड आणि आवश्यक ते सर्व कागदपत्रे जमा करून घेतले.पण प्रत्यक्षात आजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केलेली नाहीं.
सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला होता. शेती पिकांचीच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या व शेती पिके भुईसपाट झाली. तसेच झालेल्या संततधार पावसामुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
यामुळे वादळ तसेच वादळी पाऊस व सततच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.त्यानंतर महसूल विभागाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले होते व या माध्यमातून 871 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. विम्याचाही कसलाही ताळमेळ नाही. विमा भरून भरपाई मिळत नाही असा सुर शेतकरी वर्गातून येत आहे.