Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या रयतेच्या श्री नागेश विद्यालयाच्या बुक ऑफ रेकॉर्ड नोंदीमुळे जामखेडचे नाव देशपातळीवर –...

रयतेच्या श्री नागेश विद्यालयाच्या बुक ऑफ रेकॉर्ड नोंदीमुळे जामखेडचे नाव देशपातळीवर – योगेश चंद्रे

0
266

जामखेड न्युज——

रयतेच्या श्री नागेश विद्यालयाच्या बुक ऑफ रेकॉर्ड नोंदीमुळे जामखेडचे नाव देशपातळीवर – योगेश चंद्रे

देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “प्रजासत्ताक दिन “नाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाने साकारले होते यामध्ये नागेश विद्यालयाचे 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाचे 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभाग घेतला हे नाव कलाशिक्षक तथा ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारले. याची नोंद भारत सरकारच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे. हा उपक्रम नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शक व संकल्पनेतून साकार झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, कन्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, ग्रामसेवक जिल्हाकार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, कृष्णाजी भोसले ,शिवाजीराव ढाळे, पर्यवेक्षक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, कॅप्टन गौतम केळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, बाबासाहेब घोलप , संतोष पवार,गोपाल बाबर, शैलेंद्र मानकर, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

तहसीलदार योगेश चंद्रे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून जामखेडच्या वैभववाद नक्कीच भर पडणार आहे तसेच शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव देशपातळीवर चमकले आहे. ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद आहे. जामखेडच्या वैभवात नागेश विद्यालयने मानाचा तुरा रोवला आहे. व यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन असे मनोगत व्यक्त केले.

नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी मी हे रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे या शाळेतील प्राचार्य ,शिक्षक, विद्यार्थी , एनसीसी कॅडेट,नेहमीच रयत शिक्षण संस्थेचे नाव देशपातळीवर कसे येईल याचा प्रयत्न करत असतात हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये शाळेची नोंद झाली या माध्यमातून सिद्ध होते. मी रयतचा विद्यार्थी असून रयत संस्थेच्या व्यासपीठावरून रयत संस्थेचा गौरव होता आहे याचा अभिमान वाटत आहे.

प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली याची प्रेरणा आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली या विश्व रेकॉर्डमुळे आपल्या शाळाने देशपातळीवर नाव नोंदवले आहे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे म्हणून मला फार कौतुक वाटत आहे . असेच नवनवीन उपक्रम यापुढे घ्यावे असे मनोगत व्यक्त केले.

सुरेश भोसले यांनी प्रजासत्ताक दिन नावाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली त्याबद्दल सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो . ही नोंद गौरवास्पद आहे असे मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य मडके बीके यांनी मनोगत मध्ये आमदार रोहित दादा पवार यांनी विद्यालयात राजमाता जिजाऊंचे सगळ्यात मोठे रेखाचित्र साकार केले त्या प्रेरणातून आम्ही हे उपक्रम केला, नागेश विद्यायाचे भव्य मैदान पाहून मनामध्ये संकल्पना आली की आपण देशभक्तीचा उपक्रम प्रजासत्ताक दिन हे नाव विद्यालयात साकार करावे कलाशिक्षक मयूर भोसले यांनी हे नाव विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने प्रत्यक्षात साकार केले. आमच्या मनी ध्यानी नसताना हे नाव देशातील व जगातील सर्वात मोठे झाले.

कला शिक्षक एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी आमदार रोहित दादा यांच्या प्रेरणेतून प्राचार्य मडके बी के यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिन नाव साकारण्यात आले अवघ्या अर्ध्या तासांमध्ये हे नाव तयार झाले आहे या नावात नागेश चे 500 व कन्या विद्यालयाचे 500 विद्यार्थी व सतरा महाराष्ट्र बटालीयचे एनसीसी कॅडेट व शिक्षक हे सहभागी झाले याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे, हा माझा सन्मान देशाचे सैनिक व शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले यांना समर्पित करत आहे असे मनोगत व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालयाचे नोंद इंडिया बँक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याबद्दल कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार, उत्तर विभागाचे सल्लागार अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र तात्या फाळके, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर, सतरा महाराष्ट्र बटालियनची सी ओ कर्नल चेतन गुरुबक्ष, ए ओ लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग यांनी विशेष अभिनंदन केले.

तसेच संपूर्ण जामखेडकरांच्या वतीने जामखेड चे नाव देशपातळीवर चमकल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!