[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जामखेड न्युज——
साकत येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह. भ. प. महादेव महाराज राऊत यांची किर्तनसेवा संपन्न
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखले जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहाव्या दिवशी बीड येथील ह. भ. प. महादेव महाराज राऊत यांचे किर्तन झाले किर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
किर्तन सेवेसाठी त्यांनी संत नामदेव महाराज यांचा अभंग योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी । पाहता पाहता मना नपुरेचि धणी ।।१।। देखिला देखिला माय देवाचा देव । फिटला संदेह निमाले दुजेपण ।।२।। अनंतवेषे अनंतरूपे देखिले म्या त्यासी । बापरखुमादेविवर खुण बाणली कैसी ।।३।। घेतला होता.
योगिजनांना दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरीही मनाची तृप्तता होत नाही. हा देवांचा देव विठ्ठल मी पाहिला आणि मनातील सर्व संदेह संपले व मी माझे मन इतके त्याच्या ठिकाणी तद्रूप झाले की काही द्वैत उरलें नाही. पांडुरंगाची अनंत वेषातील अनंत रुपें मी पाहिली आणि तल्लीनतेने मनोमन एकात्म रुपाची खुणगाठ पटली.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त, आखील भारतीय वारकरी मंडळ प्रेरित आज गुरूवार दि. १६ एप्रिल पासून भव्य- दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात सुरूवात झाली आहे.
यावेळी हभप माऊली महाराज कोल्हे, हभप भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर महाराज मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, अतुल दळवी, अश्रू सरोदे, रामभाऊ मुरूमकर यांच्या सह सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, माऊली महाराज कोल्हे, हभप माऊली महाराज गाडे, हभप दादा महाराज सातपुते, हभप काका महाराज निगुडे, हभप पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, हभप गहिनीनाथ सकुंडे, हभप अशोक महाराज सपकाळ, विठ्ठल भजनी मंडळ, श्री साकेश्वर भजनी मंडळ, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या फडावरील भजनी मंडळ यांच्या मुळे परिसरात भक्ती मय वातावरण निर्माण झाले आहे.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप माऊली महाराज कोल्हे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते ४ हरिजागर असा दिनक्रम असेल.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा झाली
गुरूवार दि १६ एप्रिल रोजी कर्जत येथील विनोदाचार्य हभप आक्रुर महाराज साखरे
शुक्रवार दि. १७ रोजी डिकसळ येथील हभप आण्णासाहेब महाराज बोधले,
शनिवार दि. १८ रोजी कर्जत येथील हभप प्रकाश महाराज जंजिरे
रविवार दि. १९ रोजी भूम येथील हभप अतिश महाराज कदम
सोमवार दि. २० रोजी पंढरपूर येथील ज्ञानसिंधू हभप जयवंत महाराज बोधले
वरील मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने झाली.
रात्री मंगळवार दि. २१ रोजी बीड येथील हभप महादेव महाराज राऊत यांचे किर्तन झाले.
उद्या बुधवार दि. २२ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन होणार आहे.
तसेच गुरूवार दि. २३ रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.