जामखेड न्युज—-
अदिवासी पारधी महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश काळे यांची फेरनिवड
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
आतापर्यंत केलेल्या समाजबांधवांच्या उन्नती साठी सामाजिक कार्याची दखल घेत प्रकाश काळे यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काळे यांच्या निवडीमुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रकाश काळे यांनी आतापर्यंत कर्जत जामखेड व श्रीगोंदा या तीन तालुक्यात तत्कालीन प्रांताधिकारी पलांडे यांच्या बरोबर मिळुन ” पारधी विकास आराखडा ” तयार करून तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंञी स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी आदिवासी पारधी समाजातील जनतेसाठी समाजातील मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या.
या योजनांमुळे स्वाभिमान सबलीकरण योजना, बेघर लोकांसाठी घरकुल योजना, सुशिक्षित बेरोजगार युवकासाठी त्या वेळी प्रवाशी वाहन, माल वाहतूक,रिक्षा “9 बोलेरो व 5 रिक्षा “वाटप करण्यात आले यामुळे ते तरूण स्वत: च्या पायावर उभे राहिले
आदिवासी विद्यार्थी याना नामवंत इंग्लिश स्कूल मध्ये पाठवले तसेच आदिवासी आश्रम शाळेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर आहे या कामात जिल्हाधिकारी साहेब व आदिवासी विकास प्रकल्प, राजुर, अकोले यांनी मला मदत केली आहे.