नोकरी मिळवताना गुणवत्ता सिद्ध करावी लागते म्हणून पेन्शन आवश्यक – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ जामखेडमध्ये पेन्शन नाकारणाऱ्या सरकारला मतदान न करण्याची शपथ पेन्शन मिळताच मुलांचे झालेले नुकसान जादा तास घेऊन भरून काढू – शिक्षकांचा निर्धार

1
292

जामखेड न्युज——

नोकरी मिळवताना गुणवत्ता सिद्ध करावी लागते म्हणून पेन्शन आवश्यक – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

जामखेडमध्ये पेन्शन नाकारणाऱ्या सरकारला मतदान न करण्याची शपथ

पेन्शन मिळताच मुलांचे झालेले नुकसान जादा तास घेऊन भरून काढू – शिक्षकांचा निर्धार

कोणतीही शासकीय नोकरी मिळवताना गुणवत्ता सिद्ध करावी लागते नंतर नोकरी मिळते. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर पेन्शन आवश्यक आहे. समाजात सध्या पेन्शन विरोधकांकडून कसलीही माहिती नसताना वेगवेगळे गैरसमज पसरवले जातात याच्यावर विश्वास न ठेवता आपला लढा सुरूच ठेवा. तुमचा पालक म्हणून मी तुमच्या पाठिशी आहे असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

जुन्या पेन्शन साठी आज संपाचा सातवा दिवस आहे. तहसील कार्यालयासमोर आज गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी संपकऱ्यांना मार्गदर्शन केले व दि. २८ पासून सर्वच राजपत्रित अधिकारी तुमच्या बरोबर संपात उतरत आहोत असे सांगितले
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, विस्तार अधिकारी अशोक शेळके, बापुराव माने, सुनील बोराडे, शहाजी राळेभात, चंद्रशेखर नरसाळे, राम निकम संतोष राऊत, मुकुंद सातपुते, गोकुळ गायकवाड, नारायण लहाने, सिद्धनाथ भजनावळे, अशोक बांगर, केशव गायकवाड, एकनाथ चव्हाण, युवराज (दादा) गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर रामभाऊ कोळेकर, बापूराव किसन माने, अविनाश खंडेराव नवसरे, सुखदेव कल्याण कारंडे, प्रशांत दशरथ सातपुते, रामहरी राजेंद्र बांगर, पी.टी.गायकवाड, ज्योती साहेबराव पवार, किशोर शिवाजीराव बोराडे विजयराज सुभाष जाधव,राजन बाबासाहेब समिंदर, सुरज दिलावर मुंडे,शारदा वसंतराव कुटे, शोभा चांदोबा कांबळे,शिल्पा साखरे,सुदाम वराट, नितीन शिंदे,प्रशांत जाधव, रमेश मिठू बोलभट, सुरेश आत्माराम हजारे,अझरुद्दीन, उमाकांत कुलकर्णी, हनुमंत गंगाराम खाशेटे, संतोष छत्रभुज भोंडवे, रंगनाथ विश्वनाथ जगधने यांच्या सह सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोळ म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतर पेन्शन खुपच आवश्यक आहे. मी पालक म्हणून तुमच्या बरोबर आहे सरकारने लवकरात लवकर संप मिटवावा अशी विनंती करण्यात आली.

यावेळी वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

“जो पेन्शन पे बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेंगा”

” पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची “

“एकच मिशन जुनी पेन्शन”

अशा घोषणा देण्यात आल्या

यावेळी जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आमचे कुटुंबीय मतदान करतील जे सरकार पेन्शन हक्क नाकारेल त्यांना कोणीही मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आली.

चौकट
संप काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आम्ही जादा तास घेऊन भरून काढू विद्यार्थ्यांचे कसलेही नुकसान होऊ देणार नाही शासनाने ताबडतोब जुनी पेन्शन योजना लागू करावी
(राम निकम शिक्षक नेते)

1 COMMENT

  1. फक्त शेती हा व्यवसाय सोडला तर<<- इथे लोकांना दुसऱ्यांना जगवून स्वतःमद्धे मरण्याची ताकत लागते.
    सांगा की,
    आशे कोणते नोकरीचे क्षेत्र आहे जिथे गुणवंत्ता सिद्ध करावी लागत नही,
    मग काय सरकारने सगळ्यांना पेन्शन द्यायची का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here