ग्रामीण रुग्णालयावर दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करावी – अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे

0
319

जामखेड न्युज——

ग्रामीण रुग्णालयावर दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करावी – अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे

मागील पंधरा दिवसांपुर्वी ग्रामीण रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एका कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर या कर्मचाऱ्याच्या त्रासास कंटाळून एकवटलेल्या जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जामखेडचे वैद्यकीय अधिक्षक आणि अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सामुहिक लेखी तक्रारी केल्या होत्या, यावर नेमलेल्या चौकशी समितीने 8 मार्च रोजी जामखेडला भेट दिली. या भेटीत चौकशी समितीने तक्रारदार कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य संपर्क डाॅ सुवर्णमाला बांगर यांची टीम चौकशीसाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आली होती.

जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर यांच्या कारनाम्याच्या अनेक चर्चा नेहमी ग्रामीण रुग्णालयाच्या वर्तुळात होत असतात. जाधवर हे स्वता:च HOD असल्यासारखे वावरत असल्याचे सातत्याने बोलले जात होते, गेल्या काही महिन्यांपासून जाधवर आणि ग्रामीण रूग्णालयातील महिला आणि पुरूष कर्मचारी असा वाद भडकला होता. काही दिवसापुर्वी तर हा वाद जामखेड पोलिस स्टेशनपर्यंत गेला होता. आणि आता रात्रीच्या वेळी दगडफेक करणे म्हणजे दहशत निर्माण करण्यासारखे आहे तेव्हा आरोपीचा शोध घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दि. १३ मार्च रोजी कोणीतरी अज्ञाताने जामखेड ग्रामीण रुग्णालयाच्या खिडकीवर दगड मारला. यामध्ये खिडकीची काच तुटली परंतु खिडकीला मच्छर संरक्षक जाळी असल्याने दगड आत गेला नाही जर दगड जाळी तोडून गेला असता तर रुग्ण किंवा कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी यांच्या जिवीताला गंभीर धोका उद्भवला असता. यामुळे रुग्णालयीन कर्मचा-यांचे रात्रपाळीवरील शासकिय ड्युटी करत असताना जिवीतास गंभीर धोका संभवतो दगड मारणा-या व्यक्तीचा शोध घेण्याचा डयुटीवरील कर्मचारी यांनी प्रयत्न केला परंतु सदर व्यक्ती सापडली नाही. तरी अज्ञात व्यक्ती विरोधात आपले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन सदर गुन्हयाचा तपास व्हावा व दोषी व्यक्तीस सापडुन कायदयानुसार कडक कार्यवाही करावी अशी विनंती वजा तक्रार जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जामखेड येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे जामखेड शहर व परीसरातील नागरीक व रूग्णांना आवश्यकते प्रमाणे उपचार व सुविधा देत आहे. सदर शासकिय दवाखाना २४ रुग्णसेवेकरीता उघडा असतो. रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरीचारीका, कक्षसेवक यांच्या नियमितपणे ८-८ तासाच्या रोटेशन पद्धतीने डयुटी असुन सर्व अधिकारी कर्मचारी डयुटीवर हजर असतात. याच दरम्यान दि. १३ मार्च २०२३ रोजी रात्रपाळीच्या डयुटीसाठी वैदयकिय अधिकारी डॉ. युवराज खराडे, अधिपरीचारीका सविता शिंदे व सचिन बेग हे कर्मचारी रुग्णालयात सेवेत हजर होते. रुग्णालय ज्या ठिकाणी कार्यरत आहे तेथील खिडकीवर मोठ्या आकाराचा दगड फेकण्यात आला. त्यामुळे खिडकीची काच तुटली मात्र मच्छर येवु नयेत म्हणून बसवलेल्या जाळीस अडथळा होउन सदर दगड जमीनीवर पडला, जर मच्छर जाळी तुटली असती व प्रवेशदवारालगतच्या खिडकीवर तो दगड रुग्णालयात जाळी तुटुन गेला असता तर रुग्ण किंवा कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी यांच्या जिवीताला गंभीर धोका उद्भवला असता. सबब यामुळे रुग्णालयीन कर्मचा-यांचे रात्रपाळीवरील शासकिय ड्युटी करत असताना जिवीतास गंभीर धोका संभवतो दगड मारणा-या व्यक्तीचा शोध घेण्याचा डयुटीवरील कर्मचारी यांनी प्रयत्न केला परंतु सदर व्यक्ती सापडली नाही तरी अज्ञात व्यक्ती विरोधात आपले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन सदर गुन्हयाचा तपास व्हावा व दोषी व्यक्तीस सापडुन कायदयानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे यांनी केली आहे.

सदर पत्राची एक प्रत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांनाही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here