जामखेड न्युज——
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलीसांची दमदार कामगिरी
एकुण 96.040 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
जामखेड पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी धडाकेबाज कामगिरीला सुरूवात केली आहे. चोरून देशी दारू विक्री साठी घेऊन जात असलेल्या माल व गाडी ताब्यात घेत अवैध धंद्यांविरोधात आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे आरोपी विनोद शहाजी इंगळे वय 29 वर्ष राहणार हापटेवाडी तालुका जामखेड हा देशी विदेशी दारुची विक्री करण्याची बुलेट मोटार सायकल वरुन चोरुन विना परवाना वाहतुक करत आहे, आता गेल्यास सदर इसम हा मुद्देमालासह मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने त्यांनी लगेचच पो.स्टे. चे गुन्हे शोध पथक रवाना करुन
सदरची गाडी मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर इसमास अडवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण 16,040 /- रु. किमंतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व 80,000 /- रु. कि.ची मो.सा (किं. अं) असा एकुण 96,040 /- रु. मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
त्यानंतर पोकॉ. विजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाणे येथे मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. संग्राम जाधव करत आहेत.
सदरचा कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मा. राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक मा. प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आण्णासाहेब जाधव, पोनि. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोना. संग्राम जाधव, पोना. अविनाश ढेरे, पोकॉ. विजय कोळी, पोकॉ. अरुण पवार, पोकॉ. संदिप राऊत, पोकॉ. संदिप आजबे, पोकॉ./ सचिन
सगर यांचे पथकाने केली आहे.