विरोधी पक्षनेते अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६२.३७ कोटींची भरपाई

0
227

 

जामखेड न्यूज—–

विरोधी पक्षनेते अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६२.३७ कोटींची भरपाई

शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपणार; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आ. रोहित पवार यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

कर्जत-जामखेडची तब्बल 62.37 कोटींची प्रलंबित मदत महिनाअखेर मिळणार; विधीमंडळात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर-2022 मध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये नगर जिल्हयात 800 कोटींहून अधिक नुकसान झाले असून कर्जत व जामखेड तालुक्यातही कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण झाले असताना गेल्या पाच महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह इतरही आमदार नगर जिल्ह्यातील कोट्यवधींची ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी पाठपुरावा करत होते. तसेच नुकतेच विधीमंडळ अधिवेशनात अजितदादा पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचं लक्ष याकडे वेधलं होतं.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केलं की, येत्या महिना अखेर शेतकऱ्यांना सर्व प्रलंबित मदत दिली जाईल. दरम्यान, नगर जिल्ह्याची 800 कोटींहून अधिकची मदत तर कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यात मिळून एकूण 62.37 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना अद्याप कोणतीही मदत शासनाकडून देण्यात आलेली नाही. हाच विषय आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे मांडला होता. अजितदादांनी विधीमंडळात मुद्दा उपस्थित करून याबाबत एकूणच राज्याची हजारो कोटींची मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. कर्जत तालुक्यात पंचनाम्यानंतर 40.64 कोटी रुपयांची भरपाईची मागणी करण्यात आली असून जामखेड तालुक्यातून 21.73 कोटी रुपयांची भरपाईची मागणी करण्यात आली होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेले असताना ही अडचण सुटावी यासाठी आमदार रोहित पवार हे शासनाकडे पाठपुरावा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. याबाबत पालकमंत्र्यांशीही भेट झाली होती व त्यांनीही यामध्ये पुढाकार घेतला होता. आता यावर मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लवकरच हा विषय मार्गी लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. महिनाअखेर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळणार असल्याने मदतीच्या प्रतीक्षेत बसलेल्या बळीराजाला एक मोठा आधार या माध्यमातून मिळणार आहे.

प्रतिक्रिया – (चौकट)

आदरणीय अजितदादांशी हा विषय मी व महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी मांडला आणि तो सरकारपुढे विधिमंडळात अजितदादांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी पण याबाबत चर्चा झाली होती. त्यांनीसुद्धा यासाठी पाठपुरावा केला, ही मदत मार्च अखेर शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा तसेच गेल्या २ दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीतसुध्दा शासनाकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जाईल!

– रोहित पवार,
आमदार (कर्जत-जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here