डॉ. प्रविण मिसाळ यांनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ मुलांसोबत व गोशाळेस चारा वाटप करून केला साजरा

0
207

जामखेड न्युज——

डॉ. प्रविण मिसाळ यांनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ मुलांसोबत व गोशाळेस चारा वाटप करून केला साजरा

जामखेड येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. प्रविण मिसाळ यांची कन्या कु. क्रिशा प्रविण मिसाळ हिच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील अनाथ मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करून तसेच गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करून साजरा करण्यात आला.

लहान वयातच आपली संस्कृती, आपल्या आनंदात दुसऱ्यांना सामावून घेण्याची शिकवण देत मोहा फाटा येथील निवारा बालगृहातील अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा केला तसेच साकत येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित श्री साकेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करून साजरा करण्यात आला.

निवारा बालगृहातील अनाथ मुलांना खाऊ वाटप करताना निवारा बालगृहाचे अधीक्षक केसकर सर व प्रकल्प समन्वयक चव्हाण सर उपस्थित होते. 

गोशाळेत चारा वाटप करताना क्रिशा प्रविण मिसाळ, डॉ. प्रविण मिसाळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडुराजे भोसले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक मिसाळ, डॉ. वैशाली मिसाळ, लता मिसाळ, रेखा दराडे, सक्षम मिसाळ, बाळासाहेब ढाळे, कुसुम वराट, श्रेयस वराट, आजीनाथ पुलवळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. प्रविण मिसाळ हे सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. आपल्या चिमुकलीचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत तसेच गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करून साजरा करण्यात आला.वाढदिवस यामुळे डॉ. मिसाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

 

डॉ. मिसाळ यांचे दंतसेवेतील सामाजिक कार्ये

 

डॉ प्रविण मिसाळ हे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या दाताच्या समस्येसाठी शिबिराचे आयोजन करून दातांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन करतात तसेच शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर ॲकॅडमीमध्ये भावी सैनिकांच्या दातांच्या समस्येविषयी मार्गदर्शन करतात. आणी आता मुलीचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत तसेच गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करून करण्यात आला. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here