चुंबळी येथे भरदिवसा घरफोडी, चोरट्यांनी तीन लाख 22 हजार रुपये केले लंपास

0
236

जामखेड न्युज——

चुंबळी येथे भरदिवसा घरफोडी, चोरट्यांनी तीन लाख 22 हजार रुपये केले लंपास

 

घरातील लोक शेतात ज्वारी काढण्यासाठी गेल्यावर याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी तालुक्यातील चुंभळी येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 3 लाख 22 हजार रुपये लंपास केले. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामभाऊ सिताराम कारंडे वय, 32 वर्षे, रा. गडदेवस्ती, चुंबळी, ता. जामखेड हे दि 2 मार्च रोजी सकाळी आपल्या पत्नीसह शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. तर त्यांची दोन मुले हे शाळेत गेले होते. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. याच संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत भरदिवसा दुपारी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाट उचकटून कपाटातील गाई घेण्यासाठी ठेवण्यात आलेले रोख 3 लाख 22 हजार रूपये व बँकेचे दोन एटीएम कार्ड चोरुन नेले.

सायंकाळी जेंव्हा फिर्यादी हे घरी आले आसता त्यांना घराचे दार उघडे दिसले त्यामुळे आत जाऊन पाहिले आसता कपाटाचे लॉक तुटलेले दिसले व घरातील सामान अस्त व्यस्त पडलेले दिसले. फीर्यादी यांनी कपाटात पाहीले आसता गाई घेण्यासाठी कपाटात ठेवलेले 3 लाख 22 हजार रुपये रोख व दोन ए टी एम चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी फिर्यादी रामभाऊ कारंडे रा. चुंबळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत. जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शेतात ज्वारी काढण्याचे काम सुरू आसल्याने ग्रामीण भागात दिवसभर घरी व वाड्या वस्त्यांवर कोणी नसते आणि याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here