आमदार प्रा. राम शिंदे आणि कुटूंबियांच्या उपस्थितीत पार पडला विठ्ठलाचा गंगाजल महाअभिषेक सोहळा होळकर राजघराण्याच्या 250 वर्षांच्या परंपरेचे शिंदे कुटूंबीय बनले साक्षीदार!!

0
252

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे आणि कुटूंबियांच्या उपस्थितीत पार पडला विठ्ठलाचा गंगाजल महाअभिषेक सोहळा

होळकर राजघराण्याच्या 250 वर्षांच्या परंपरेचे शिंदे कुटूंबीय बनले साक्षीदार !

महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुर येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गंगाजल महाअभिषेक सोहळा पार पडला. इंदोरच्या होळकर राजघराण्याकडून गेल्या 253 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या या परंपरेचे साक्षीदार बनण्याचा मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला.

इंदोरच्या होळकर राजघराण्याकडून गेल्या 253 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महाअभिषेक केला जातो. यंदा महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या महाअभिषेक सोहळ्यासाठी आणि विठ्ठल पुजेसाठी होळकर ट्रस्टच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला दिला जाणारा गंगाजल अमृत कलश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील वंशज आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते देवस्थानचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजता हा सोहळा पार पडला. त्यानंतर देवस्थानकडून विठ्ठलाचा गंगाजल महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची महापुजा संपन्न झाली.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 18 रोजी रात्री बारा वाजता गंगाजल महाअभिषेक आणि महापुजा पार पडली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासमवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा राम शिंदे, आई भामाबाई शंकर शिंदे, पत्नी आशाताई राम शिंदे, मुलगी अन्विता राम शिंदे, मुलगा अजिंक्यराजे राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर सह आदी उपस्थित होते.

इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 253 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा केली जाते.यासाठी इंदोर येथील होळकर ट्रस्टच्या वतीने गंगेचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री येथून पवित्र जल आणले जाते. या पवित्र जलाचा 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीवर दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता महाअभिषेक केला जातो. तसेच महापूजा केली जाते.आषाढी एकादशीला विठ्ठलाची जशी महापूजा असते तशीच महापुजा महाशिवरात्री दिवशी केली जाते.या महापुजेसाठीचे सर्व साहित्य होळकर ट्रस्टकडून दिले जाते. यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील अर्थात चोंडीचे सुपुत्र आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना होळकर राजघराण्याकडून मान देण्यात आला होता. शिंदे कुटूंबियांच्या हस्ते गंगाजल अमृत कलश आणि विठ्ठल महापुजेचे साहित्य देवस्थानला सुपूर्द करण्यात आले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गंगाजल महाअभिषेक करण्याची परंपरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल ट्रस्ट इंदोर यांच्या वतीने  253 वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. यावर्षी  ट्रस्टच्या वतीने गंगा नदीचे पाणी (गंगाजल) श्री  विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष ह. भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील वंशज आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. यावेळी महाशिवरात्री निमित्त गंगाजल महाआभिषेक पुजा पार पडली. 364 दिवस विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण केले जाते परंतु महाशिवरात्रीदिवशी बेल वाहिले जाते.शैव वैष्णवाचे प्रतिक म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर गंगाजल महाअभिषेक करण्याची परंपरा सुरु केली होती. ही परंपरा आजही कायम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here