जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढारी वडाची विंचरणा नदीकाठी पुर्नलागवड
राष्ट्रीय महामार्गच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असणारे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली शहरातील जनतेच्या भावना निर्माण झालेले वडाचे झाड म्हणजे पुढारी वड याचाही नंबर आला आणी तोही तोडला गेला तेव्हा अनेकांनी वडाबद्दल आपापल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी दुख व्यक्त केले तर राजकीय पक्षांनी पुजा केली तेव्हा महामार्गालगत तोडल्या गेलेल्या झाडांची पुर्नलागवड करणे गरजेचे अशा आशयाची बातमी “जामखेड न्युजने” प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत आमदार रोहित पवारांनी झाडांची पुर्नलागवड करण्याचे काम हाती घेतले.
आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भगवान शंकराच्या मूर्तीसमोर विंचरणा नदीकाठी जो जाँगिंग ट्रँक रस्ता केलेला आहे त्या कडेला वडाच्या झाडांची पुर्नलागवड करण्यात आली.
महामार्गालगत असलेल्या पुढारी वडाला करवत लागली वरच फांद्या तोडल्या तेव्हा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आमदार रोहित पवारांनी वडाची पुर्नलागवड करण्यासाठी संबंधित यंत्रणा यांना संपर्क केला बांधकाम विभागाशी संपर्क केला आज सकाळी पुणे येथील कंपनीचे औताडे यांनी झाडावर रासायनिक प्रक्रिया केली लेप लावला सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा सपाटीकरण केला खोल सात फुट खड्डा घेतला आणि सकाळी क्रेनच्या साहाय्याने टिपर मध्ये टाकून विंचरणा नदीकाठी पुर्नलागवड केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचेकर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सुर्यकांत मोरे, उमरभाई कुरेशी, नगरसेवक मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, युवकचे तालुका अध्यक्ष अमोल गिरमे, काकासाहेब राळेभात, हरिभाऊ आजबे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, सचिन शिंदे, वसीम सय्यद, गणेश हगवणे, आमदार रोहित पवार यांचे स्विय सहायक नंदकुमार हंगे, बालाजी पोटे, अंगद वाळुंजकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय कुरघोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पुढारी वडाची पुर्नलागवड करणार आहे हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजले त्यांनी शुक्रवारी सायंकाळी जेसीबी मशिनच्या सहाय्याने वडाचे खोड उकरून काढले पण ते उचलण्यासाठी क्रेन व टीपर उपलब्ध झाले नाही तेव्हा सकाळी लागवड करण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी क्रेन टिपर व जेसीबी मशिनच्या सहाय्याने महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर झाडांची पुर्नलागवड केली.
झाडे लावून विकासाची स्पर्धा करावी
आम्ही एक झाड लावले तर भाजपाने दहा झाडे लावून शहरात विकासाची स्पर्धा करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. आमदार रोहित पवारांनी शंभर कोटी विकास निधी आणला तर आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिडशे कोटी विकास निधी आणावा विकासाची स्पर्धा करावी कोणी कोणाचे कामे अडविण्याची स्पर्धा करू नये असे सामान्य जनतेला वाटत आहे.