जामखेड न्युज——
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यामुळे जामखेडमध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्या गटाला दिले यामुळे शिवसेनेच्या वतीने जामखेड शहरात युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट, युवासेना उपप्रमुख नितीन कोल्हे, दयानंद कथले, नागेश झाडबुके, योगेश यादव, गणेश साळुंखे, ओम जाधव, शंकर इंगळे, सुरज बरे, अवधूत गोसावी, अजय कात्रजकर, प्रेम जाधव, श्रीकांत बजगुडे, महेश काटकर यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या निकालामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांना सर्वात जास्त आनंद झाला असेल हा निकाल म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा विजय आहे. आता आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिळाले आहे. हाच खरा शुभसंकेत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांचा खरा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हिंदुत्वाचे काम करून करत आहेत. मुख्यमंत्री हे अहोरात्र जनतेसाठी काम करतात हा खरा जनतेचा विजय आहे. जामखेड तालुक्यात शिवसेनेला सुवर्ण दिवस आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक अधिक जोमाने काम करू असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे धनुष्यबाण
आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्या गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटलं आहे.
एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. यामुळे जामखेड शहरात फटाके फोडून घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.