आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून तसेच लहुजी शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आरणगावचा पाणी प्रश्न सुटणार!!!

0
204

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून तसेच लहुजी शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आरणगावचा पाणी प्रश्न सुटणार!!!

आरणगावचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आमदार प्रा श्री राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे जामखेड तालुका सरचिटणीस मा लहुजी शिंदे सरपंच अंकुश शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 3 कोटी 22 लाख २३५ रुपये रकमेची विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे त्यामुळे आरणगावचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. वीज, पाणी, यासंबंधीचे गावा अंतर्गत नियोजन करून ग्रामस्थांना विविध सुविधा पुरवणे आणि त्यासाठी राज्य शासन, लोक प्रतिनिधी, जि प . यांच्या निधीतून विविध विकास कामे मंजूर करून घेऊन त्याची अंमल बजावणी करणे होय. अरणगावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूपच बिकट आणि सर्वात महत्वाचा आता गावासाठी महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे .


मा आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत तरडगाव ते अरणगाव या पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ६६ लाख ६५२३५ रूपये मंजूर झाले आहेत* . . . (टाकी/ मेन लाईन HDP पाईप/ वितरण व्यवस्था/ सर्व वस्त्या ना पाईप लाईन करणे)

माननीय आमदार प्रा राम शिंदे साहेब यांचे माध्यमातून

दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत

1) बौद्धविहार साठी १३ लाख रुपये 2) वामनभाऊ मंदिरासाठी सभामंडप १० लाख रुपये 3) खामगाव ते अरणगाव खडीकरण १० लाख रुपये
4) अंगणवाडी क्र १ साठी ९ लाख ७५ हजार रुपये 5) 25/15 गाव आतर्गत सिमेंट क्रॉकिट करणे १० लाख रुपये

6) जि प प्राथमिक शाळा डिजीटल करणे २ लाख ६० हजार रुपये.

असा विकास निधी अरणगाव साठी माननीय सरपंच अंकुश शिंदे भाजपा जामखेड तालुका सरचिणीस श्री लहुजी शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे . हा निधी माननीय आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या मुळे प्राप्त होणार आहे.

सरपंच अंकूश शिंदे उपसरपंच आप्पासाहेब राऊत सदस्य ॲड संजय पारे डॉ ससाणे रमजान शेख गाहिनाथ डमाळे व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here