Wednesday, February 11, 2026
Home राजकारण वंचितच्या नवनाथ पडळकरांसह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश वंचित समाजाला राजकीय प्रक्रियेत सहभागी...

वंचितच्या नवनाथ पडळकरांसह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश वंचित समाजाला राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश – नवनाथ पडळकर

0
210

जामखेड न्युज——

वंचितच्या नवनाथ पडळकरांसह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

वंचित समाजाला राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश – नवनाथ पडळकर

वंचित समाजाचे अनेक प्रश्न आहेत हे सोडविण्यासाठी तसेच समाजाला राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहोत असे पडळकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

आम्ही गेली अनेक वर्षे विविध संघटनेच्या माध्यमातून बहुजन, ओबीसी, व्ही. जे. एन. टी. एस. टी.एस.सी., अल्पसंख्याक शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर राज्यभर मोर्चे, आंदोलन करुन रस्त्यावरील लढाया लढत राहिलो. सत्तेशिवाय निर्णय प्रक्रियेत प्रवेश नाही म्हणूनच या समुहांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झालो.


यामागील प्रमुख हेतू म्हणजे

१) वंचित समुहांची सत्ता आणणे
२) छोट्या समजघटकालही राज्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभाग देणे .
3) घराणेशाही चा अंत करून खरी आम जनतेच्या मनातील प्रतिनिधी निवडून आणणे आणि खरी लोकशाही मजबूत करणे.

त्यासाठीच लोकसभा, विधानसभा निवडणुका देखील लढविल्या. परंतु वंचितांना सत्ताधारी समाज बनविण्याचे प्रयत्न अपुरेच पडले.

समाजाला केवळ आश्वासने देऊन फार काळ राजकारण शक्य नसते आणि जोपर्यंत राजकारणाच्या मुख्य प्रवाहात म्हणजेच निर्णय प्रक्रियेत या वंचित समाजाला संधी मिळत नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन अशक्य आहे. हाच अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा केली. अठरा पगड जाती धर्मातील वंचित समाजाला, ओबीसी, VJNT समाजाला राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात सामील करून सन्मानजनक स्थान आणि शक्ती देण्याचा आणि पर्यायाने वंचित समाजाच्या ‘समावेशक राजकारणा’ चा नवा प्रवाह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणूनच आम्ही सर्वजण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन वंचित उपेक्षित समाजाच्या कल्यानाचा ठरविलेला अजेंडा पुर्ततेसाठी नवा अध्याय सुरु करण्याचा संकल्प करीत आहोत.

 

BJP प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांची यादी
———————

नवनाथ पडळकर (बारामती लोकसभा उमेदवार २०१९ संस्थापक, प्रदेश महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य)

सुधाकरराव आव्हाड (अहमदनगर) राहुल ओव्हाळ
लोकसभा उमेदवार शिरूर

प्रकाश राठोड (प्रदेशाध्यक्ष ) बंजारा क्रांती दल, राज्य समन्वयक OBC VJNT

दीपक बोराडे (विधानसभा उमेदवार भोकरदन)
माजी जिल्हा अध्यक्ष VBA, RSP

रामदास महानवर (विधानसभा उमेदवार वाई) महाबळेश्वर खंडळा विधानसभा

अशोक कोळेकर (जिल्हा संघटक जनताराज अभियान) संचालक खरेदी विक्री संघ नेवासा

शेखर बंगाळे (सोलापूर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडी)

अनिल गोयेकर (महाराष्ट्र विकास आघाडी मराठवाडा संघटक)

सुरज रणदिवे (युवक प्रदेश अध्यक्ष जनताराज अभियान)

गजानन देवकते(नांदेड जिल्हा संघटक जनताराज अभियान)

गणेश कुंभार (सातारा जिल्हा अध्यक्ष जनताराज अभियान)

बाबासाहेब आल्हाट, विठ्ठलदादा खताळ आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!