जामखेड न्युज ——
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार- सरपंच निलेश पवार
पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्यात गेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला याचवेळी शासनाने अतिवृष्टी जाहीर केली पंचनामे केले पण सहा महिने होत आले तरी अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही तेव्हा शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न बावीचे सरपंच निलेश पवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता पचंनामे झाले पण शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचे झालं काय अशी विचारणा सोशल मीडियावर सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील शेकऱ्यांचे या वर्षी पावसा मुळे पिकांचे खूप मोठें नुकसान झाले होते. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर पण केला होता. तालुक्यांतील सर्व पचंनामे करुन घेतले.तेव्हढे नाहीं तर सर्व शेतऱ्यांना आपले खाते नंबर तसेच आधार कार्ड आणि आवश्यक ते सर्व कागदपत्रे जमा करून घेतले.पण प्रत्यक्षात आजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केलेली नाहीं.
तरी या गोष्टीची दखल घेऊन नुकसा झालेल्या शेतकर्याना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. या सरकारने नुसती भुलवा भुलवी करू नये मदत जाहिर करुन शेतकरी यांना देऊन टाकावा ही विनंती. नाही तर येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असं बावी गावाचे सरपंच निलेश पवार यांनी सांगितलंय