जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी खर्डा व नान्नज येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन गायवळ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29 जानेवारी रोजी खर्डा व नान्नज येथे मोफत महाआरोग्य शिबिर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन खर्डा व नान्नज येथील डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते होणार आहे.

या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान तपासणी करून श्रवण यंत्रे दिले जाणार आहेत, तसेच हृदयाचे आजार यामध्ये ब्लड प्रेशर व इसीजी मशीनद्वारे हृदयाची मोफत तपासणी तसेच इतर आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तरी खर्डा व नान्नज परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन यांनी गावातील व्यक्तींना आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेऊन गोरगरीब जनतेस शिबिरासाठी आणावे तसेच खर्डा व नान्नज येथील गावातील लोकांची वाहन व्यवस्था केली जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त गरजू लोकांनी खर्डा व नान्नज येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सचिन सर गायवळ विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.





