जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला पत्रकार दिनाचा विसर!!!
आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांना पत्रकार दिनाचा विसर पडला आहे. भाजपाने मात्र पत्रकार दिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित करत पत्रकारांचा सन्मान केला. आमदार रोहित पवार दरवर्षी पत्रकार दिन आयोजित करत असतात पण या वर्षी पत्रकार दिनाचा विसर पडलेला दिसत आहे.
गेली चार वर्षे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करणारे आमदार रोहित पवार यांना या वर्षी पत्रकार दिनाचा विसर पडला आहे. पत्रकार दिन होऊन पंधरा दिवस झाले तरी जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला विसर पडल्याचा दिसत आहे.
जामखेड तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार दिन साजरा केला पत्रकारांचा सन्मान केला इतरांना मात्र विसर पडल्याचा दिसत आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना आमदार रोहित पवार तसेच त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या पत्रकार दिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित करत व पत्रकारांचा सन्मान करत होते आता सत्ता बदल झाला आणि आमदार रोहित पवारांना पत्रकार दिनाचा विसर पडला आहे असे दिसते.
जामखेड तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान केला तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनीही कार्यक्रम आयोजित केला होता याचबरोबर खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान केला स्नेह मेळावा आयोजित केला होता. विद्यमान आमदार रोहित पवार यांना पत्रकार दिनाचा विसर पडलेला दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.