जामखेड न्युज——
भाजपा सरकारने सलीम बागवान यांच्या रूपाने कर्जत जामखेडचा सन्मान केला – सरपंच गफ्फारभाई पठाण
सलीम बागवान यांचा गफ्फारभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने सत्कार संपन्न
सलीम बागवान यांना भाजपा सरकारने हाज कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती केल्यामुळे जामखेड चा सन्मान वाढला आहे. असे सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्य पदी सलीम बागवान यांची निवड झाल्या बद्दल जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते व दबंग सरपंच गफ्फारभाई पठाण व सर्व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक मोरे, राजेंद्र सिंगने, संजय ढवळे, आय्यास पठाण, निवृती महारनवर, मुकुंद आप्पा कडु, शिवाजी तनपुरे, तंटामुक्ति अध्यक्ष देवा मोरे, युवराज पवार, नाना वाघमोडे, अफसर पठाण, दत्ता भाकरे, इरफ़ान शेख, मुजाहिद पठाण, रज्जाक मुलानी, अशोक समुद्र, बापु मोरे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.