जामखेड न्युज——
जिल्हा परिषद अहमदनगर कडून रवींद्र भापकर सरांचा दुहेरी सन्मान..!!
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण विभाग पेपरलेस करून शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ अध्यापनासाठी मिळावा यासाठी शिक्षण विभाग अहमदनगर चे प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेतर्फे ओपन लिंक्स फाऊंडेशन च्या सहकार्याने विनोबा शिक्षक सहाय्यक कार्यक्रम हे अँड्रॉइड App वापरास परवानगी देण्यात आली आहे.
या App मधे शिक्षकांचे उपक्रम अपलोड केल्यानंतर प्रत्येक महिन्यातील सर्वोत्कृष्ट उपक्रमाची पोस्ट ऑफ द मंथ म्हणून निवड होवून त्यांस जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकारी मार्फत सन्मानित करण्यात येणार आहे.
या पहिल्या पोस्ट ऑफ द मंथ पुरस्काराचे पाहिले मानकरी बनल्याबद्दल “पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार” तसेच या App च्या विकसनात जिल्हा कोअर कमिटी मेंबर म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावल्यामुळे “मार्गदर्शक पुरस्कार” अशा दोन पुरस्काराने जामखेड तालुक्यातील जि. प.शाळा सरदवाडी येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक तथा राज्याच्या शिक्षण विभागाचे थिंक टँक गटाचे सदस्य श्री रवींद्र भापकर सर यांना अहमदनगर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांनी सन्मानित केले.
यावेळी शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील,ओपन लिंक्स चे सीईओ संजय दालमिया, जिल्हा समन्वयक श्री रवींद्र कापरे आदी उपस्थित होते.