गणित विज्ञान प्रदर्शनात ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या आयर्न गायकवाडच्या उपक्रमास प्रथम क्रमांक

0
190

जामखेड न्युज——

गणित विज्ञान प्रदर्शनात ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या आयर्न गायकवाडच्या उपक्रमास प्रथम क्रमांक


तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथील तालुकास्तरीय ४७ व्या विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या आयर्न गायकवाडच्या उपक्रमास प्रथम क्रमांक मिळाला आहे यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


इयत्ता पहिली ते पाचवी (गणित) या गटात जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन शिवाजी गायकवाड हा विद्यार्थी सहभागी झाला होता. आर्यन याने सोप्या पध्दतीने वर्ग करणे हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जवळा येथे पार पडलेल्या गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनात ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन शिवाजी गायकवाड याने गणित प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे साहेब, तसेच तालुका गणित-विज्ञान संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

आर्यन शिवाजी गायकवाड या विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा संचालक प्रा. कैलास माने (सर), सौ. वर्षा माने, प्रिन्सिपल आरोरा व शिक्षक स्टाफ व पालकांनी आर्यनचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here