Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी स्वीकारला पदभार भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्कारासाठी...

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी स्वीकारला पदभार भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्कारासाठी रस्सीखेच

0
266

जामखेड न्युज——

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी स्वीकारला पदभार

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्कारासाठी रस्सीखेच

जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी म्हणून अजय साळवे यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. तडकाफडकी बदली झालेले मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सुमारे अडीच वर्षे मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले यावेळी अनेक राजकीय नेते व पक्ष त्यांच्या विरोधात गेले बदलीसाठी मुख्यमंत्री यांना साकडे घातले. लगेच बदली होणार असे काही राजकीय पक्ष सांगत होते. तर कुणी कोठेही गेले तरी एक महिना बदली होणार नाही असे काही राजकीय पक्ष सांगत होते. शेवटी एका महिन्यानंतर दंडवते यांची बदली झाली आणी त्यांच्या जागी अजय साळवे हे आले त्यांनी आज पदभार स्वीकारला यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला

भाजपाच्या वतीने सत्कार करताना नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे, शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, शहर सरचिटणीस अर्जुन म्हेत्रे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तुषार बोथरा, शहर संघटन चिटणीस संजय राऊत, नितीन धनवडे, मोहन देवकाते, विनोद बेलेकर, किरण जाधव, कैलास मोरे, रवि शिरसाठ, दादा मोरे, करण घायतडक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदेचे बदलून गेलेले मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली होण्यासाठी जामखेड भाजपाच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना यश येऊन दंडवते यांची वरिष्ठ पातळीवरून बदली होऊन अजय साळवे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचा आज विविध पक्ष संघटनांच्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला.

जामखेड ‘राष्ट्रवादी’ कडून नूतन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत…।

 

जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नूतन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांची स्वागतपर भाषणे झाली, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, युवक शहराध्यक्ष अमोल गिरमे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे,संजय डोके, प्रा.राहुल आहिरे,कलीमुल्ला चाचा(छोटू वस्ताद) ,प्रकाश काळे,नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव,मोहन पवार,महेंद्र राळेभात,चाँद तांबोळी,दादा महाडिक,ऋषी कुंजीर, सचिन शिंदे,काशिद आदी उपस्थित होते.

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी अजय साळवे यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!