Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे वाटप.

0
196

 

जामखेड न्युज——

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे वाटप.

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाच्या जामखेड तालुक्याच्या वतीने येथील निवारा बालगृहात साजरा करण्यात आला. बालगृहातील मुलांना मिठाई व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी निवारा बालगृहातील चिमुकल्या लहान मुलांच्या हस्ते केक कापून नामदार रामदास आठवले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊचे व मिठाईचे वाटप करून शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, नामदार रामदास आठवले यांनी शोषित पीडित बहुजन समाजासाठी अहोरात्र काम केलेले आहे .समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात लढणारे झुंजार नेतृत्व आठवले यांच्याकडे पाहिले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा समाजाला मंत्र दिला त्यामुळे समाजाची मुलं शिकले पाहिजेत याच उद्देशाने निवारा बालगृहातील लहान मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच निवारा बालगृहाचे संचालक डॉ.अरुण जाधव यांचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष चव्हाण सर यांनी केले.

यावेळी जामखेडचे नगरसेवक शामीर भाई सय्यद, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सुनील साळवे रिपाई चे नेते धरम (दादा) घायतडक, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा सोनवणे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जामखेड तालुका युवकाध्यक्ष देवा साळवे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी साळवे, ग्राम पंचायत सदस्य राम साळवे, नगर सेवक शामीर सय्यद, बापू जावळे, सुजित धनवे, सतीश साळवे गौतम साळवे ,महादेव महानोर,लखन साळवे, आदी बहुसंख्येने रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!