जामखेड न्युज——
येणाऱ्या सर्वच निवडणूकीत भाजपबरोबर युती करून भगवा फडकविणारच – जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला जामखेडमध्ये खिंडार अनेक युवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्रात सत्ता बदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. पेट्रोल, डिझेल किंमती कमी केल्या, अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना मदत केली, एसटी कामगारांच्या समस्या सोडविल्या याचबरोबर घराणेशाही संपवण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. येणाऱ्या सर्वच निवडणुकीत भाजपबरोबर युती करून नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणारच असा विश्वास बाळासाहेबाची शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी व्यक्त केला.

जामखेड तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक तरूणांनी बाबुशेठ टायरवाले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष देविदास बादलकर यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता यावेळी त्यांना शिवसेनेचे शहरप्रमुख पद देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा प्रमुख सुमीत वराट,जहिर शेख, सुधाकर समुद्र, देविदास बादलकर, अझहर शेख, राजू शेख, वसीम शेख, वसीम कुरेशी (बिल्डर) मित्रमंडळाच्या वतीने बाबुशेठ टायरवाले यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पै. योगेश तावरे, पै. प्रशांत गायकवाड, पै. मनोज पवार यांच्या सह अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी यावेळी मेजर मुस्तफा शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन तांबोळी, शहारूफ सय्यद, पठाण तबरेज यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री अहोरात्र जनहितासाठी काम करत आहेत. पक्षात काम करणाऱ्या सर्व जातीधर्माच्या युवकांना स्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री व खासदार विखे यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावण्याचे काम करणयात येईल.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्या वरही त्यांनी टिका केली. पवारांचे मोठ मोठे उद्योग धंदे आहेत मतदारसंघातील जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. तीन वर्षांत साधे खड्डे बुजवता आले नाहीत असा हा आमदार आहे.
यावेळी बोलताना युवासेना प्रमुख सुमीत वराट म्हणाले की, आमच्या पक्षात जातीपातीचे राजकारण केले जात नाही तर विकासाचे राजकारण केले जाते. तसेच शिवसेनेत कोणत्याही कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होणार नाही. बाबुशेठ यांच्या माध्यमातून आपण आपल्या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यत मांडू शकतो. तसेच पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण विकास कामे मार्गी लावू असे सांगितले.
तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले की, आमच्या शिवसेनेत सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत आहे. अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. मुख्यमंत्री व पक्षावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत जामखेड तालुक्यात दर रविवारी प्रवेश होत आहेत. आता ग्रामीण भागातीलही अनेक प्रवेश होणार आहेत.
आभार मेजर मुस्तफा शेख यांनी मानले


