घरकुलाबाबत नगरपरिषद पुर्णपणे सहकार्य करणार- मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते घरकुलांच्या कामात नगरपरिषदेचे कार्य उल्लेखनीय

0
181

जामखेड न्युज——

घरकुलाबाबत नगरपरिषद पुर्णपणे सहकार्य करणार- मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते

 घरकुलांच्या कामात नगरपरिषदेचे कार्य उल्लेखनीय

जामखेड नगरपरिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजना घटक क्रमांक 4- वैयक्तिक घरकुल पुर्ण करून घेण्यात मोठे यश आले असून उर्वरित लाभार्थ्यांनी आपली घरकुलांची कामे सुरू करावीत. आपली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर असल्याने लाभार्थ्यांनी अडचण असल्यास नगरपरिषदेशी संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.

याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी जामखेड नगरपरिषद हद्दीत पंतप्रधान आवास योजनेच्या झालेल्या कामांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार जामखेड नगर परिषदेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या एकूण ५३९ घरकुलांचे बांधकाम सुरू झालेले आहे. १)आज रोजी एकूण सुरु झालेली घरकुले ५३९, २) आज रोजी पर्यंत पूर्ण झालेली एकूण घरकुले ३२८,

३) अंतिम टप्प्यात असलेली घरकुले १४६, ४)एकूण मंजूर घरकुले ७४३, ५) पैकी दुसऱ्या dpr मधील मंजूर घरकुले २०५ पूर्वीच्या डीपीआर मधील त्रुटी लक्षात घेता दुसरा डीपीआर अचूक बनवण्यासाठी दक्षता घेतलेली आहे. ६) नगरपरिषदेला पहिल्या डीपीआर मधील मंजूर घरकुलांसाठी अडीच लाखांपैकी २ लाख २० हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. व दुसऱ्या डीपीआर मधील एकूण २०५ पैकी १८९ लाभार्थ्यांना प्रती घरकुल १ लाख याप्रमाणे अनुदान नगर परिषदेला प्राप्त झालेले आहे. यातील उर्वरित १६ लाभार्थ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे, ७) लाभार्थीच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्यांना बांधकाम सुरू करण्यासाठी नगर परिषदे मध्ये वार्ड निहाय महिन्यातून एक बैठक घेतली . त्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला व कामे सुरू करून विविध टप्प्यावरील कामे वेळोवेळी पूर्ण केली.

८) विविध टप्प्यावरील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ फोटो काढून त्याबाबतची प्रक्रिया केली व फोटो काढल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तात्काळ त्यांच्या खात्यावर अनुदान नगरपरिषदेने वेळोवेळी जमा केले. ९) घरकुलाचे अनुदान उपलब्ध असल्याने व फोटो काढल्यानंतर दोन ते तीन दिवसात अनुदान तात्काळ खात्यावर जमा होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला. १०) लाभार्थ्यांना घरकुलाचा प्लॅन तयार करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी नगरपरिषदेने २ खाजगी आर्किटेक्चरची प्रती घरकुल १ हजार रुपये दराप्रमाणे नियुक्ती केलेली असल्याने घरकुल लाभार्थींना प्रस्ताव तयार करण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. ११)मंजूर ७४३ घरकुलांपैकी ५९९ घरकुलांना बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे.

यापैकी ६० लाभार्थिनी बांधकाम परवाना घेतलेला असूनही अद्याप काम सुरू केले नाही त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करून पूर्ण करण्याबाबत तसेच उर्वरित १४४ लाभार्थिनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज देऊन बांधकाम परवानगी घ्यावी व लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्याबाबत आवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here