जामखेड न्युज——
गोरगरीब कष्टकरी समाजाचे रक्षण करणारा कार्यकर्ता……
-देवेंद्र कुमार सिंगदिल्ली येथे मानव अधिकार रक्षण पुरस्कार प्रदान
गोरगरिबांचे कैवारी, दिनदलितांचे व अनाथाचे नाथ ॲड. डॉ अरुण जाधव यांना ॲक्शन ऍड या संस्थेच्या वतीने “”मानव अधिकार रक्षक”” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार न्यू दिल्ली या ठिकाणी जनरल सेक्रेटरी नॅशनल ह्युमन राईट कमिशन भारत सरकारचे प्रतिनिधी मा. देवेंद्र कुमार यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला.
ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भटके- विमुक्त, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, दलित, अत्याचार ग्रस्त, महिला, मुले, अन्न, वस्त्र, निवारा, जमीन, पाणी,घरे, आदी प्रश्नांवरती काम केले,
गेली 30 वर्षापासून महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यांमध्ये देखील या वरील घटकांच्या प्रश्नावरती शांततेच्या मार्गाने आवाज उठवून शासन दरबारी आंदोलने, मोर्चे निदर्शने काढून या समाजाला गाव-गाड्यांमध्ये आणून त्यांना नागरिकत्वाचे पुरावे मिळून देण्यात आले, यामध्ये रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, , जातीचे दाखले इत्यादी या समाजाला नागरिकत्वाचे पुरावे मिळून देण्यात आले,
महाराष्ट्रातील प्रत्येक वाडी वस्ती- तांडे, गाव, पालावरती जाऊन या समाजाला संविधानाने माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेले हक्क अधिकार समजून सांगुन शिक्षण किती महत्त्वाचे असते याची जाणीव करून दिली, आणि या आदिवासी घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी जामखेड या ठिकाणी निवारा बालगृह नावाचे एक अनाथ आश्रम उभा करून या अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार,लोक कलावंत, भटके विमुक्त, आदिवासी, दलित समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण, संगोपन, करण्यासाठी निवारा बालगृह नावाचा प्रकल्प उभा करून 83 मुला- मुलीनां शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले
या सर्व कामाची दखल घेऊन आज त्यांना ॲक्शन ऍड या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला,
यावेळी डॉ. शांता सिन्हा चाइल्ड राईट कमिशन भारत सरकार, डॉ.ललीता कुमार मंगलम, डॉ. लताजी महिला आयोग चेअरमन भारत सरकार न्यू दिल्ली यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी भारताचे प्रतिनिधी तनवीर काझी, मसकूर अलम, संदीप छाछरा हे उपस्थित होते यावेळी भारतातील 25 राज्यातील सामाजिक क्षेत्रातील सहकारी उपस्थित होते.
यावेळी पुरस्कार कर्ते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव बोलताना म्हणाले की हा मिळालेला सन्मान माझा नसून हा सन्मान वंचित, कष्टकरी, शेतकरी गरीबांचा आहे, आत्तापर्यंत व्यवस्थेने आम्हाला सन्मान देण्याचा नाकारला होता, परंतु आता मी हा सन्मान खेचून आणण्याचे प्रयत्न केले आहेत.