जामखेड न्युज——
भटक्या विमुक्तांचे प्रश्न दिल्ली येथे मांडताना ॲड.डॉ.अरुण जाधव
न्यू दिल्ली वाय.एम.सी.ए टुरिस्ट होस्टेल सी यु एम प्रोग्राम सेंटर येथे…भारतीय पातळीवर मानवी हक्क संरक्षण या विषयावर आय आय टी भारताची राजधानी येथे दिनांक 13/12/2022 व 14/12/2022 या दोन दिवशीय परिषदेत भटके-विमुक्त आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर.. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले तरी पण अजून भटके विमुक्त समाजाला भटकंती करावी लागते. भटकंती करत असल्यामुळे एक जागेवर स्थायिक नाही. राहण्यासाठी स्वतःची जागा नाही.
मोठा व्यवसाय नाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. बालविवाह केल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अस्वच्छता, निवारा, हक्क आणि अधिकार भटके-विमुकत्तांच्या प्रश्नांवर न्यू दिल्ली येथे ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड.डॉ.अरुण जाधव मांडणी करत असताना त्यांनी खालील प्रश्न मांडले
भटके आणि विमुक्त जाती जमातीच्या नागरिकांना दाखले मिळण्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात, सरकारी जमिनींवरील वसाहती नियमित कराव्यात, लघुउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, बेरोजगारांना रोजगार द्यावा, वसंतराव नाईक महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, या मागण्या दिल्ली येथे करण्यात आल्या.