अनाथाचे नाथ दिनदलिताचे कैवारी ॲड. डॉ. अरुण (आबा)जाधव समाजरत्न पुरस्कार जाहीर माझा सन्मान नसून हा सन्मान वंचित समूहाचा आहे- ॲड.डॉ.अरुण(आबा)जाधव जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
257

जामखेड न्युज——

अनाथाचे नाथ दिनदलिताचे कैवारी ॲड. डॉ. अरुण (आबा)जाधव समाजरत्न पुरस्कार जाहीर

माझा सन्मान नसून हा सन्मान वंचित समूहाचा आहे- ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

गेल्या सत्तावीस वर्षापासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दलित,आदिवासी, भटके-विमुक्त, वंचित अल्पसंख्यांक, विधवा, परितक्ता महिला,अनाथ मुले, शेतकरी कष्टकरी याच्या बाजूने सतत हक्क अधिकाराचे लढे उभा करून न्याय मिळवून देण्याचं काम करणारे दिनदलिताचे कैवारी अनाथांचा नाथ अरूण जाधव यांना विक्रमशीला हिंदी विद्यापीठ भागलपुर (बिहार)केंद्रीय शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कारामुळे जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गेल्या 27 वर्षापासून हे काम करत असताना जेल मध्ये जावे लागले. जीव घेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. अनेक जिल्ह्यामधे लढा देत असताना गुन्हे दाखल झाले. या सर्व कामाची माहिती घेवून. विक्रमशीला हिंदी विद्यापीठ भागलपुर (बिहार)केंद्रीय शाखा महाराष्ट्र राज्य दि.10/12/2022 रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,वाणिज्य विभाग सभागृह पुणे येथे.ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा.डॉ संजीवजी सोनवणे यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती विक्रमशीला हिंदी विद्यापीठ भागलपुर, बिहार संस्थापक डॉ. तेजनारायण कुशवाहा. कुलपती डॉ. संभाजीराव बाविस्कर परभणी उपकुलपती डॉ.शिवलाल जाधव पुणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here