—-तर जामखेड तालुका राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी असेल – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
179

जामखेड न्युज——

—-तर जामखेड तालुका राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी असेल – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

तुमची साथ आणि सहकार्य असेल तर जामखेड तालुका राज्यात पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरू शकतो. ज्यांच्या खात्यात घरकुलांसाठी रक्कमा जमा झाल्या आहेत, अशा लाभार्थ्यांनी आपले घरकुल वेळेत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आयोजित केलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या मेळाव्यात पोळ बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने, सिद्धनाथ भजनावळे ग्रामविकास अधिकारी एम.पी. शेख, सरपंच महेंद्र मोहळकर, उपसरपंच संजय साठे, ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती मोहळकर, सावता मोहळकर, दादा साबळे, जाफर शेख, दत्ता परदेशी, राजू शेख, दादा नंदिरे, आदम शेख, सद्दाम पठाण, अमर चाऊस, मुस्ताक पठाण, अजय राजपूत, दिलीप बेंद्रे यांच्यासह घरकुल लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पोळ म्हणाले की, समाजातील बेघर नागरिकांसाठी रमाई, शबरी घरकुल योजना आहे. तशीच ओबीसी, खुल्या मागील वर्षातील घरकुले पूर्ण केल्यामुळे नाशिक विभागात असणाऱ्या पाच जिल्ह्यांतील ७० तालुक्यांत जामखेड तालुक्याने दुसरा क्रमांक मिळविला होता. ज्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी स्वघोषणापत्र करून शासनाने दिलेली रक्कम परत करावी. तसेच प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. घरकुल लाभार्थ्यांनी आपलं घरकुल वेळेत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले

वेगाने घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यासह ग्रामपंचायत व पंचायत समितीचा करण्यात येतो सन्मान

नागरिकासाठी सरकार लवकरच स्वतंत्र यंत्रणा राबवून त्यांना देखील घरकुलांचा लाभ देणार आहे. घरकुल वेगाने पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यासह ग्रामपंचायत, तसेच पंचायत समितीचा सन्मान करण्यात येतो. मानले. विस्तार अधिकारी बी. के. माने, सरपंच महेंद्र मोहळकर, लियाकत शेख यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी एम.पी.शेख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here