जामखेड न्युज——
संजय वराट यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठणच्या मुख्याध्यापकपदी संजय वराट यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
शिवपट्टण ग्रामीण विकास मंडळ खर्डा संचलित जिजामाता हायस्कूल देवदैठणच्या मुख्याध्यापकपदी संजय वराट यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवपट्टण ग्रामीण विकास मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई गोलेकर, संस्थेचे सचिव संग्राम गोलेकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
संजय वराट हे या संस्थेत 26 वर्षापासून नोकरी करीत आहेत, त्यांनी नेहमीच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी जामखेड पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. यापूर्वी मुख्याध्यापक पदी नियुक्त असलेले प्रकाश खारगे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी संजय वराट यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या संदर्भात वराट यांचे जामखेड तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
याप्रसंगी खर्डा गावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, कै. डॉ. शिरीष पाटील पतसंस्थेचे सचिव नंदकुमार गोलेकर, विकास बेलेकर, संग्राम ढोले व सागर पिंगळे इत्यादी उपस्थित होते.