शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी ?

0
172

 

जामखेड न्युज——

शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी?

भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर शिंदे गटाला पहिले सर्वात मोठ गिफ्ट मिळाले ते म्हणजे मुख्यमंत्री पद आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यात मंत्रिपदांची समसमान वाटणी झाली. यांनतर आता गटाला पुन्हा एकदा मोठ गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

यामध्ये एक कॅबिनेट तर दुसरे राज्यमंत्रीपद असेल. गजानन किर्तीकर आणि हेमंत पाटील या दोन खासदारांना ही मंत्रिपदे मिळतील अशी माहिती काही वृत्त पोर्टलवर प्रकाशित झाली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याआधीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळात पदाची मागणी केली होती.

 

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही प्रवेश करत आहे.

 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वास मानले जात होते. दिलीप कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here