वाघ पिंजऱ्यातून सुटला – रोहित पवार

0
237

जामखेड न्यूज—-

वाघ पिंजऱ्यातून सुटला – रोहित पवार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेने एकच जल्लोष केला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून वाघ पिंजऱ्यातून सुटल्याचं म्हटलं आहे.

 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 12 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओत एक भला मोठा पिंजरा दिसत आहे. हा पिंजरा उघडतो. त्यातून शांतपणे बसलेला वाघ मोठ्या रुबाबात झेप घेतो आणि दमदार पावलं टाकत जंगलाकडे झेप घेतो. अ,सं या व्हिडीओत दिसतं. या व्हिडीओ पोस्टवर सत्यमेव जयते अशी कॅप्शन देण्यात आली आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या अकाऊंटला टॅग करण्यात आलं आहे.

तुमची बाजू कशी मांडता यावर जामीन मिळतो. राऊत 100 दिवसांपासून जामिनासाठी संघर्ष करत होते. आज त्यांना न्याय मिळाला. राऊत मीडियासमोर आपली बाजू नेहमीच जोरदारपणे मांडली होती. त्यामुळे मी हटके ट्विट केलं आहे.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुप्रिया सुळे यांच्यावरील विधानाचाही समाचार घेतला. मंत्र्याने अहंकारातून महिलेवर टीका केली. या मंत्र्याला एवढा अहंकार असेल तर सरकारला किती अहंकार असेल हे दिसून येतं. या सरकारमधील अनेक नेत्यांनी महिलांच्या विरोधात अनेकदा विधाने केली आहे. त्यांच्या अहंकारातून ही विधाने आली आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

या कृषी मंत्र्यांनी अहंकारातून खालच्या पातळीवर जाऊन विधान केलं. त्यामुळे त्यांचा राजीनामा या सरकारने घेतला पाहिजे. पण हे सरकार राजीनामा घेणार नाही, कारण हे सरकार अहंकाराने भरलेलं आहे, असं ते म्हणाले.

सुप्रिया सुळे, जयंतराव पाटील आणि मीही या यात्रेत सहभागी होणार आहे. ही अराजकीय यात्रा आहे. मलाही या यात्रेत जायचं आहे. मलाही या यात्रेबद्दल कुतुहूल आहे. मीही सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देण्यासाठी यात्रेत सहभागी होईल, असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here