जामखेड न्युज——
स्वप्नपूर्ती नगरच्या उड्डाणपुलाची… तेवीस महिन्यांतच उभा राहिला पूल १९ नोव्हेंबर रोजी शुभारंभ

नगरकरांसाठी स्वप्नावत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात 17 डिसेेंबर 2020 रोजी प्रारंभ झाला होता. अखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन 19 नोव्हेंबर 2022 रोजी पूल नगरकरांच्या सेवेत रूजू होत आहे. कोरोना काळात पुलाच्या कामाचा थोडासा खोळंबा झाला पण तरी काम वेगाने सुरू राहिले. शहरातील उड्डाणपुलासाठी माजी खासदार स्व. दिलीप गांधी, माजी आमदार स्व. अनिल राठोड, खासदार डॉ. सुजय विखे, शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विशेष प्रयत्न केले.

दिलीप गांधी यांच्यानंतर केंद्र स्तरावर खासदार विखे पाटील यांनी प्रयत्न केले. त्यातील सरंक्षण मंत्रालयाकडून उड्डाण पुलासाठी एनओसी आणणे सर्वात मोठे काम होते. ओम गार्डनसमोर उड्डाण पूल संपतो. यश पॅलेश चौक व चांदणी चौक ते एसबीआय चौकमध्ये गार्डर टाकून पुलाचे गाळे भरण्यात आले.

अन्य गाळ्यांवर सोनेवाडी परिसरात सिगमेंट तयार करून ते आणून बसविले आहे. चांदणी चौकात पुलावरून उतरता येणार आणि चढताही येणार आहे. पुण्याकडून आलेली वाहने जामखेड व सोलापूरला जाण्यासाठी चांदणी चौकात पुलावरून खाली उतरू शकतात. तर, जामखेड व पाथर्डी वरून आलेली वाहने चांदणी चौकातून पुलावर चढू शकतात. त्या पद्धतीने पूल बनविण्यात आला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उड्डाण पुलाबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुरू आहे.
नगरकरांची उड्डाणपुलाची स्वप्नपूर्ती पूर्ण….
असेल मी.. नसेल मी.. विकासातून सदैव दिसेल मी..
स्व.खासदार दिलीपजी गांधी साहेब,
ज्यांच्या पालकमंत्री काळात मंजुरी मिळाली असे
आमदार प्रा राम शिंदे साहेब
व ज्यांनी मुहुर्थ मेढ रोवली असे स्व खासदार दिलीप गांधी व ज्यांनी कळस रचला असे लाडके खासदार मा डाॅ सुजय (दादा) विखे पाटील
ज्यांनी या उड्डाणपूला साठी निधी उपलब्ध करून दिला असे मा ना खा नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते 19/11/2022 रोजी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

चौकट
उड्डाण पुलाचे काम वेळेत पूर्ण झालेले त्याचे समाधान आहे. त्यासाठी विविध विभागाच्या अधिकार्यांनी सहकार्य केले. पाऊस आणि काही तांत्रिक गोष्टींमुळे कामला विलंब झाला अन्यथा तीन महिने अगोदरच काम पूर्ण झाले असते. पुलाच्या भूसंपादनासाठी खासदार व आमदारांनी विशेष सहकार्य केले.
– प्रफुल्ल दिवाण,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण



