जामखेड न्युज——
खंडणी मागितली हे सिद्ध करावे राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे -डॉ.भगवानराव मुरूमकर
अंदुरे बंधूनी आतापर्यंत तीन कुटुंबे उध्वस्त केले आहेत.!!!
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांच्या वर पन्नास लाख रुपये खंडणी मागितली असा गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपाचे खंडण करण्यासाठी डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी पत्रकार परिषद घेत खंडणी मागितली हे सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे. अंदुरे बंधूनी आतापर्यंत जामखेड मधील तीन कुटुंबे उध्वस्त केले आहेत त्याची चौकशी करावी असे आवाहन डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी केले.
यावेळी डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विलास मोरे, भरत जगदाळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुरूमकर म्हणाले की, मी गेल्या बावीस वर्षापासून राजकारणात आहे. माझा राजकीय अश्वमेध कोणी रोखू शकत नाही त्यामुळे मुद्दाम राजकीय शडयंत्र केले आहे. जर मी खंडणी मागितली हे सिद्ध करावे मी आज सर्व पदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे.
दहा वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात आहे. १२-१७ सभापती होतो. १७ते २२ सदस्य आहे. मी आतापर्यंत एकही निवडून हरलो नाही त्यामुळे मुद्दामहून अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. खोटा गुन्हा दाखल केला आहे बावीस वर्षात जर एक रूपयांची खंडणी कोणाला मागितली असेल तर राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे. माझा भांडणात संबंध नाही. तरीही मुद्दामहून अडकविण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वतः ला व्यापारी समजणाऱ्या उमेश अंदुरे यांने माझ्या मोबाईल वर खोटे मेसेज केलेले आहेत.रात्री नऊ ते बारा दोघे भाऊ कोठे असतात याची चौकशी करावी करावी आतापर्यंत तीन कुटुंबे उध्वस्त केले आहेत. चोरीच्या मोटारीतील तांब्याची काढून टेम्पो भरून माल कोणी विकला हे जामखेड शहर व तालुक्याला माहिती आहे याचीही चौकशी व्हावी दोन नंबर धंदे यांचेच आहेत.
यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, मी आजपर्यंत कधीच कोणाला तसेच व्यापाऱ्यांनाही कसलाही त्रास दिला नाही. आजपर्यंत कोणत्याही व्यापाऱ्यांला दोन रूपये कधी मागितले नाहीत. अंदुरे यांनी खंडणी मागितली हे सिद्ध करावे मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे. हे मला अडकविण्यासाठी विरोधकांकडून शडयंत्र आहे. मला निवडणुकीत हरवा असे खोटे गुन्हे दाखल करू नका.
सहा निवडणुकीत एकही निवडणुकीत हरलो नाही माझी कसलाही ठेकेदारी नाही जर आरोप सिद्ध झाले तर स्वतः जेलमध्ये बसण्यासाठी तयार आहे.
परवा झालेले भांडणात उमेश अंदुरे दारू पिऊन आला व भांडण केले. हे जनतेने पाहिले आहेत
पैशाच्या जोरावर आतापर्यंत तीन कुटुंबे उद्ध्वस्त केले आहेत यांच्या पासून सावध राहावे असे आवाहन मुरूमकर यांनी केले आहे.