Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मोफत फिजिओथेरपी शिबिराचा शेकडो रूग्णांना...

सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मोफत फिजिओथेरपी शिबिराचा शेकडो रूग्णांना फायदा

0
211

 

जामखेड न्युज——

सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मोफत फिजिओथेरपी शिबिराचा शेकडो रूग्णांना फायदा!!! 

सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित फिजिओथेरपी निसर्ग उपचार शिबिराचा परिसरातील शेकडो रूग्णांना फायदा झाला. यात मान दुखी, गुडघे दुखी, नसांशी जोडलेल्या तक्रारी, हातापायांना मुंग्या येणे, लकवा पँरालेसीस, टाच दुखणे, संधीवात, आमवात, वातांचे सर्व प्रकार, अपंगत्व, शरिरातील नसा लेन्स चालू करणे या सर्व आजारांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी डॉ. सुरज माने (डिप्लोमा इन फिजिओथेरपी असिस्टंट यांची टीमने उपचार केले. सकाळी नऊ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १५० पेक्षा जास्त रूग्णांनी उपचार व मार्गदर्शन घेतले.

या शिबिरात मसाज अँक्युप्रेशर, मँट, आय एफ टी मशीन, मसाज बेड, टेंन्स लेग मशिन, फुट पाणी मशीन, ट्रॅक्शनट्रॅक्शन या मशीन द्वारे उपचार करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांच्या माध्यमातून गावात लोकांना बसण्यासाठी बाकडे, गाव व वाड्यात एलईडी लॅम्प, गावात मुरमीकरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इंग्रजी पुस्तके आणि आता राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी परिसरातील ऊसतोड मजुरांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे आणि आता फिजिओथेरपी शिबिर घेतले.

आतापर्यंत सागर कोल्हे यांनी गावात सततच्या पावसामुळे गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता याचा त्रास शाळकरी मुले व ग्रामस्थांना सहन करावा लागत होता नीट चालता येत नव्हते. ही अडचण ओळखून गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांनी पदरमोड करून गावात चाळीस ट्रॅक्टर मुरुम टाकला यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांची चिखलापासून सुटका झाली आहे. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी सागर कोल्हे यांचे आभार मानले होते.

वाढदिवसानिमित्त त्यांनी राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तके दिली तसेच गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पंचवीस एलईडी लॅम्प बसविले यामुळे गाव प्रकाशमान झाले.

 

 

सागर कोल्हे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी येथे नदीखोलीकरन च्या कामात महत्वाची भूमिका घेऊन 1 km नदीचे खोलीकरण केले आहे. यामुळे राजुरी गावात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

तसेच राजुरी डोळेवाडी येथे बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्वखर्चाने 40 बाकडे बसवले आहेत,,110 LED लॅम्प बसवले आहेत. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते यात अनेकांनी आपली कला सादर केली.

तसेच परिसरातील सैन्यात भरती झालेल्या आर्मीतील जवानांचा सत्कार केला व रोख बक्षीस दिले.

राजुरी ,डोळेवाडी, एकबुर्जी मधील 80 टक्के जनतेची मागणी आहे असा सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध सरपंच करावा

येणाऱ्या काळात राजुरी गाव तालुक्यातील एक आदर्श गाव निर्माण केले जाईल. असेही कोल्हे यांनी सांगितले.

आज सामाजिक कार्यकर्ते मा सागर भाऊ कोल्हे यांनी राजूरी मध्ये मोफत फिजिओथेरपी पायांची मसाज व निसर्ग उपचार शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घेतला ,सागर भाऊ कोल्हे यांनी आज पर्यंत राजुरी डोळेवाडी, एकबुर्जी,बांगरवस्ती येथे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत, भविष्यात पण असेच उपक्रम राबविले जातील अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मा सागर भाऊ1कोल्हे यांनी दिली, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सागर भाऊ कोल्हे मित्र परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक धनाजी शिंदे, महादेव शिंदे,विलास कोल्हे, मल्हारी गायकवाड ,लटपटे मामा,दगडू कोल्हे, सरपंच गणेश कोल्हे,पोपट पिसाळ, अश्रू मेजर काळदाते, गौतम काळदाते,आप्पासाहेब राऊत, विठ्ठल मोरे, उपसरपंच बाबासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य बबन कोल्हे, धनराज कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, डॉ नानासाहेब खाडे,मल्हारी सदाफुले,विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे व्हाईस चेरमन विजय खाडे, संचालक गोकुळ कोल्हे, विकास गायकवाड, आलेश मोरे, संजय चौभारे, डॉ युवराज चौभारे, उत्तम चौभारे, जयसिंग कोल्हे,अमोल पिसाळ, सचिन कोल्हे,दत्ता डोंगरे, यांच्या सह सागर भाऊ कोल्हे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!