Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या मुळे वंचित घटकांची व बालकांची दिवाळी गोड आठ...

नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या मुळे वंचित घटकांची व बालकांची दिवाळी गोड आठ वर्षापासून दिपकीटचे वाटप

0
196

 

जामखेड न्युज——

नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या मुळे वंचित घटकांची व बालकांची दिवाळी गोड
आठ वर्षापासून दिपकीटचे वाटप

जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक मा.अमित भाऊ चिंतामणी यांच्या वतीने दिपावलीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक १३ येथील नागरिकांना व समाजातील वंचित बालकांसाठी दिप किट चे वाटप करण्यात आले.

प्रत्येकाच्या घरामध्ये-मनामध्ये असीम आनंदाची अनुभूती येण्यासाठी ही दीपकिट स्नेहभेट देण्यामागचा मानस आहे अशी माहिती कार्यसम्राट नगरसेवक मा.अमित (भाऊ) चिंतामणी मित्रपरिवाराचे मुख्यसंयोजक योगेश राऊत यांनी दिली.

नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक नवोपक्रम जामखेड शहरांमध्ये राबवण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्नशील असतात. गेल्या आठ वर्षांपासून नवरात्र उत्सवामध्ये जेष्ठ नागरिकांना मोहटा देवी’चे दर्शन घडवून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नुकत्याच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना ओपन गरबा दांडियाच्या निमित्ताने प्रमुख आकर्षण म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. जामखेडकरांच्या व विध्यार्थी आणि महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने एक सांस्कृतिक मेजवानीच यानिमित्ताने जामखेडकरांनी अनुभवली.

आपल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये दर्जेदार विकास कामे करून नागरिकांच्या मनामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करत समस्त जामखेडकर एक सृजनशील नेतृत्व म्हणून अमित भाऊंकडे पाहिले जाते.”नगरसेवक असावा कसा” हे चिंतामणी यांनी विकासात्मक कामे करीत दाखवून दिले आहे. एक संवेदनशील नेतृत्वाची जबाबदारी स्विकारत नेहमीच समाजातील प्रत्येकाच्या अडचणींना मदत करणारे, प्रश्न सोडवणारे माता-भगिनींच्या विश्वासास पात्र राहून काम करणारे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.

विकासात्मक राजकारण करणारा राजकारणी म्हणून जामखेड तालुक्यामध्ये आपलं नाव कोरले आहे.नागरिकांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडणारे चिंतामणी हे प्रत्येकाला आपल्या घरातील एक सदस्य असल्याची जाणीव नक्कीच होते.असं सृजनशील व्यक्तिमत्व प्रभाग १३ लाभलं आणि विकासात्मक कामे करून संपूर्ण प्रभाग विकसित प्रभाग म्हणून जामखेडकरांच्या दृष्टीक्षेपात एक व्हिजन म्हणून येत आहे.

महिला आणि मुलींसाठी व नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देत अनेक नवोपक्रम राबविण्यात येणार आहोत अशी माहिती योगेश राऊत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!