पंजाब राज्य सरकारने केली जुनी पेन्शन लागू, मुख्यमंत्री भागवंत मान महाराष्ट्र शासन कधी करणार
देशातील बहुतांश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी केंद्र सरकार पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . परंतु या पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळत नसल्याने सर्वच राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेची मागणी करु लागले आहेत.
पंजाब राज्य सरकारचे मुख्यमंत्री भागवंत मान यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणानिमित्त जुनी पेन्शन लागु करुन मोठी भेट जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासने दिले आहेत. पाहु अभ्यास करू, या पलीकडे महाराष्ट्र सरकार गेले नाही. देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजनालागू केली आहे. महाराष्ट्र राज्य पुढारलेले राज्य असूनही अद्याप जुनी पेन्शन योजना का लागू करत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार पेन्शन योजना लागू एकमुखी लागू होते पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का लागू होत नाही असा संतप्त सवाल कर्मचारी विचारत आहेत.
पंजाब राज्य सरकारने सन 2004 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . सदर योजनेस पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मोठा विरोध होत होता.
पंजाब राज्याची विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीवेळी आप पक्षाने कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते कि , आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास पंजाब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . याच आश्वासनाची पुर्तता मुख्यमंत्री भागवंत मान यांनी ट्वीट करुन राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने जुनी पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा केली आहे .
2004 नंतर जे कर्मचारी पंजाब शासन सेवेत रुजु झालेले आहेत त्याचबरोबर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना देखिल जुनी पेन्शन प्रमाणे इतर सर्व लाभ लागु करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्याची घोषणाा केली आहे . या निर्णयाचे पंजाब राज्य कर्मचाऱ्यांकडुन त्याचबरोबर इतर राज्यातील कर्मचाऱ्यांकडुन देखिल स्वागत केले जात आहेत .