जामखेड न्युज——
कै.श्रीम.कुसुम(लक्ष्मी) वसंतराव होळकर यांच्या दुःखद निधनाने होळकर कुटुंबियावर शोककळा..!
स्वराज नगर, तपनेश्वर गल्ली, जामखेड येथील रहिवासी कै.श्री.कुसुम(लक्ष्मी) वसंतराव होळकर(वय वर्ष ८९) यांचे आज शुक्रवार,दि.२१ ऑक्टोबर २०२२ रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पच्छात एक भाऊ,दोन बहिणी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे,नातेवाईक व मोठा आप्त परिवार आहे.
अत्यंत प्रेमळ व सुस्वभावाच्या त्या होत्या.जामखेड येथील सुप्रसिध्द भेळ व्यवसायिक श्री.राजेंद्र व श्री.दिगंबर वसंतराव होळकर यांच्या मातोश्री होत्या.
तर श्री.प्रविण राजेंद्र होळकर (स्वराज बॅग प्रिंटर्स,अध्यक्ष स्वराज मित्र मंडळ),श्री.प्रशांत राजेंद्र होळकर (प्राथमिक शिक्षक, जि.प.प्रा.शाळा सारोळा) व श्री.संतोष राजेंद्र होळकर (वरिष्ठ लाईनमन,एम.एस.ई.बी.जामखेड ) यांच्या त्या आजी होत्या.
त्यांच्यावर आज दुपारी २.०० वाजता जामखेड अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.