संत संगतीचा व्यवहार उत्तम आहे – ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

0
176

जामखेड न्युज——

संत संगतीचा व्यवहार उत्तम आहे – ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे

वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

     
संत संगतीचा व्यवहार हा उत्तम आहे,तो शब्दाने काय सांगावा? मनुष्य देह मिळाला हा लाभ झाला,त्यानंतर संतांचे दर्शन झाले हा दुसरा लाभ अशाप्रकारे लाभाने लाभ वाढतच गेला दुप्पट झाला,या सर्वांन मुळे जीव सुखावला हा तीसरा लाभ झाला मला संतांच्या भेटीची ओढ होती असे हभप ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे यांनी किर्तन सोहळ्यात सांगितले.

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये हभप ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे यांचे मोठ्या उत्साहात किर्तन झाले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते. कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 

हभप संदिपान महाराज शिंदे त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले. 

बरवें देशाउर झालो । काय बोले बोलावे ॥१॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें झाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥२॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥

अर्थ

संत संगतीचा व्यवहार हा उत्तम आहे,तो शब्दाने काय सांगावा? मनुष्य देह मिळाला हा लाभ झाला,त्यानंतर संतांचे दर्शन झाले हा दुसरा लाभ अशाप्रकारे लाभाने लाभ वाढतच गेला दुप्पट झाला,या सर्वांन मुळे जीव सुखावला हा तीसरा लाभ झाला मला संतांच्या भेटीची ओढ होती.ती भेट मोठ्या भाग्याने घडून आली. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत मी परमार्थाचा जो श्रम केला,तो सफल झाला.

 

 
तसेच यावेळी हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, दिपक महाराज गायकवाड, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

       
श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.  

आज मंगळावर सायंकाळी दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे यांचे किर्तन झाले.तसेच उद्या बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 

 

      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here